डे-नाईट टेस्टमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड?

मुंबई तक

अहमदाबाद: अहमदाबाद भारत आणि इंग्लंडमध्ये चार टेस्ट मॅचच्या सीरीजमधील तिसरी मॅच उद्यापासून (24 फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमध्ये होणारी ही मॅच डे-नाइट असणार आहे. भारतीय टीमची ही आतापर्यंतची तिसरी डे-नाईट टेस्ट मॅच आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत 2 डे-नाईट टेस्ट मॅच खेळल्या आहेत. पहिली डे-नाईट टेस्ट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अहमदाबाद: अहमदाबाद भारत आणि इंग्लंडमध्ये चार टेस्ट मॅचच्या सीरीजमधील तिसरी मॅच उद्यापासून (24 फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमध्ये होणारी ही मॅच डे-नाइट असणार आहे. भारतीय टीमची ही आतापर्यंतची तिसरी डे-नाईट टेस्ट मॅच आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत 2 डे-नाईट टेस्ट मॅच खेळल्या आहेत. पहिली डे-नाईट टेस्ट मॅच ही 2019 साली कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये खेळविण्यात आली होती. ही मॅच भारताने एक इनिंग आणि 46 रन्सने जिंकली होती.

यानंतर टीम इंडियाने परदेशात पहिल्यांदा पिंक बॉल टेस्ट मॅच खेळली होती. ज्यामध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला होता. ही मॅच मागील वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आली होती. या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये अवघ्या 36 रन्सवर ऑलआऊट झाली होती. टेस्ट मॅचच्या इतिहासात भारताचा हा निच्चांकी स्कोअर आहे.

त्यामुळे जर आपण डे-नाइट टेस्ट मॅचचा भारताचा रेकॉर्ड पाहिल्यास 50-50 असाच आहे. कारण एका मॅचमध्ये भारताला विजय मिळाला तर एका मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण घरच्या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड हा 100 टक्के आहे. अशावेळी आता हे पाहावं लागणार आहे की, इंग्लंडविरुद्धच्या डे-नाइट मॅचनंतर देखील हा रेकॉर्ड कायम राहतो का?

ही देखील बातमी पाहा: होय, मी देखील नैराश्याचा सामना केलाय ! विराट कोहलीने दिली कबुली

हे वाचलं का?

    follow whatsapp