SA vs IND : दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सेंच्युरिअन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चाहत्यांची निराशा झाली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाने लाववेल्या हजेरीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने ३ गडी गमावत लोकेश राहुलच्या शतकाच्या जोरावर २७२ धावांपर्यंत मजल मारली. परंतू दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सेंच्युरिअनच्या मैदानावर ढग जमा झाले […]
ADVERTISEMENT

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सेंच्युरिअन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चाहत्यांची निराशा झाली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाने लाववेल्या हजेरीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने ३ गडी गमावत लोकेश राहुलच्या शतकाच्या जोरावर २७२ धावांपर्यंत मजल मारली. परंतू दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सेंच्युरिअनच्या मैदानावर ढग जमा झाले होते. यासाठी सामनाधिकारी आणि पंचांनी लंच सेशनची घोषणा केली. परंतू यानंतरही पाऊस थांबत नसल्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
दरम्यान, पहिल्या दिवसाच्या खेळात व्हाईस कॅप्टन पदावर प्रमोशन झालेल्या लोकेश राहुलने पहिल्याच कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली आहे. लोकेश राहुलच्या या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेत तब्बल १४ वर्षांनी भारतीय संघासोबत एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. २००७ साली केप टाऊन कसोटी सामन्यात मुंबईच्या वासिम जाफरने शतक झळकावत हा बहुमान पटकावला होता.