IPL 2021 : RCB प्ले-ऑफमध्ये दाखल, पंजाबवर ६ रन्सने मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज तिसऱ्या संघाने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ने अटीतटीच्या लढतीत पंजाबवर ६ रन्सनी मात करत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. या पराभवासह पंजाबचं या हंगामातलं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे.

सामन्यात पहिल्यांदा बॅटींगचा करणाऱ्या RCB ने चांगली सुरुवात केली. विराट कोहली आणि देवदत पडीक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोन्ही फलंदाज पंजाबच्या बॉलर्सच्या नाकीनऊ आणणार असं वाटत असतानाच हेन्रिकेजने विराटला आऊट केलं. लागोपाठ डॅनिअल ख्रिश्चनही हेन्रिकेजचा शिकार बनला. चांगल्या सुरुवातीनंतर अचानक RCB च्या संघाला लागोपाठ दोन धक्क्यांमुळे हादरे बसले. या धक्क्यांमधून सावरण्याचा प्रयत्न RCB करत असतानाच हेन्रिकेजने पडीक्कलला आऊट करत RCB च्या अडचणी वाढवल्या.

यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हीलियर्स या दोन फलंदाजांनी पुन्हा एकदा महत्वाची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मॅक्सवेलने विशेषकरुन पंजाबच्या गोलंदाजांवर आक्रमकपणे हल्ला चढवत ३३ बॉलमध्ये ५७ रन्स केल्या. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. डिव्हीलियर्स रनआऊट झाल्यानंतर पंजाबने अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना झटपट गुंडाळत RCB ला १६४ धावांवर रोखलं. पंजाबकडून हेन्रिकेज आणि शमीने ३-३ विकेट घेतल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल पंजाबनेही धडाकेबाज सुरुवात केली. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल या दोन्ही सलामीवीरांनी RCB वर हल्लाबोल करत संघाची बाजू मजबूत केली. दोन्ही बॅट्समननी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. मयांक अग्रवालने अर्धशतक झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. शाहबाज अहमदने लोकेश राहुलला आऊट करत पंजाबची जोडी फोडली. यानंतर पंजाबच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. ठराविक अंतराने पंजाबचे फलंदाज माघारी परतत राहिले, ज्यामुळे मोक्याच्या क्षणी पंजाब भागीदारी करु शकला नाही. हेन्रिकेज आणि शाहरुख खानने अखेरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली खरी…परंतू त्यांचे प्रयत्न अपूरेच पडले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT