IPL Media Rights: 43 हजार कोटींना विकले आयपीएलचे मीडिया हक्क; BCCI होणार मालामाल
आयपीएल मीडिया राइट्स (IPL Media Rights) लिलावामधील दोन पॅकेजेसचा लिलाव पूर्ण झाला आहे. ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी आयपीएलच्या टीव्ही हक्कांचा लिलाव झाला. यामध्ये प्रत्येक सामन्याला 57.5 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार आहेत. त्याच वेळी, डिजिटल अधिकारांचा लिलाव प्रति सामन्यासाठी 48 कोटी रुपये करण्यात आला आहे. हे पुढील पाच वर्षांसाठी आहे. क्रिकबझने याबाबत माहिती दिली आहे. म्हणजेच […]
ADVERTISEMENT

आयपीएल मीडिया राइट्स (IPL Media Rights) लिलावामधील दोन पॅकेजेसचा लिलाव पूर्ण झाला आहे. ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी आयपीएलच्या टीव्ही हक्कांचा लिलाव झाला. यामध्ये प्रत्येक सामन्याला 57.5 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार आहेत. त्याच वेळी, डिजिटल अधिकारांचा लिलाव प्रति सामन्यासाठी 48 कोटी रुपये करण्यात आला आहे. हे पुढील पाच वर्षांसाठी आहे.
क्रिकबझने याबाबत माहिती दिली आहे. म्हणजेच टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना दाखवण्यासाठी बीसीसीआयला एकूण 105.5 कोटी रुपये मिळणार आहेत. हा लिलाव पुढील पाच वर्षांच्या हक्कांसाठी आयोजित केला गेला होता, म्हणजेच BCCI 2023 ते 2027 या कालावधीतील मीडिया अधिकारांची विक्री करत आहे.
पॅकेज-अ आणि पॅकेज-बी या दोन श्रेणींसाठी हा लिलाव करण्यात आला आहे. या दोन श्रेणींसाठी एकूण 43,255 कोटी रुपये सांगितले जात आहेत. पॅकेज-ए ची एकूण किंमत 23,575 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, पॅकेज बी ची एकूण किंमत 19,680 कोटी रुपये आहे. पॅकेज-ए भारतातील टीव्ही अधिकारांसाठी आहे तर पॅकेज-बी ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिकारांसाठी आहे. यामध्ये एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की पॅकेज-ए जिंकणारी कंपनी पॅकेज-बी जिंकणाऱ्या कंपनीला एक कोटी अतिरिक्त रकमेसह आव्हान देऊ शकते.
ईपीएलला मागे टाकत आयपीएलची सरशी
एका सामन्यातून कमाईच्या बाबतीत आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगला (ईपीएल) मागे टाकले आहे. इंग्लंडच्या फुटबॉल लीगची किंमत प्रति सामन्यासाठी 81 कोटी रुपये आहे, परंतु आयपीएलने त्याला मागे टाकले आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीगने लिलावाच्या पहिल्याच दिवशी हा आकडा पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी अधिक बोली लावली गेली.