मायकल वॉनकडून अहमदाबादच्या पिचची पुन्हा खिल्ली

मुंबई तक

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडला पराभवाचा धक्का देत सिरीजमध्ये २-१ ने आघाडी घेतली. स्पिनर्सना मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी मैदानावरचा हा सामना अवघ्या दोन दिवसांमध्येच संपला. या पराभवामुळे तिळपापड झालेल्या इंग्लंडच्या माजी प्लेअर्सचा राग अजुनही शांत झालेला दिसत नाहीये. टीम इंडिया आणि बीसीसीआयवर टीका करणाऱ्या इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनने पुन्हा एकदा मोटेराच्या पिचची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडला पराभवाचा धक्का देत सिरीजमध्ये २-१ ने आघाडी घेतली. स्पिनर्सना मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी मैदानावरचा हा सामना अवघ्या दोन दिवसांमध्येच संपला. या पराभवामुळे तिळपापड झालेल्या इंग्लंडच्या माजी प्लेअर्सचा राग अजुनही शांत झालेला दिसत नाहीये. टीम इंडिया आणि बीसीसीआयवर टीका करणाऱ्या इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनने पुन्हा एकदा मोटेराच्या पिचची खिल्ली उडवली आहे.

४ मार्चपासून अहमदाबादच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मायकल वॉनने त्याआधी भारतीय शेतकऱ्याचा नांगर घेऊन शेत नांगरतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत…चौथ्या टेस्ट मॅचसाठीची तयारी जोरात सुरु असल्याचं म्हटलंय.

याआधीही मायकल वॉनने मोटेराच्या पिचवर आपली नाराजी बोलून दाखवली होती. भारतासारख्या मजबुत देशांना यापुढे हवं ते करण्याची मुभा दिली जाईल तोपर्यंत आयसीसी हे एखाद्या दात पडलेल्या वाघाप्रमाणे दिसत राहिलं असं वॉनने टेलिग्राफमधील कॉलममध्ये म्हटलं होतं. आयसीसीची गव्हर्निंग बॉडी भारताला मनासारखं पिच बनवण्याची मूभा देतेय, जे टेस्ट क्रिकेटसाठी धोकादायक असल्याचंही वॉनने म्हटलंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp