MS Dhoni : याला म्हणतात फिटनेस! 41 वर्षीय धोनीच्या बायसेप्सची चर्चा, Photo पाहिलेत का?
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सध्या एमएस धोनी (MS Dhoni) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या तयारीत व्यस्त आहे. आयपीएल 2023 सीझनमधील पहिला सामना 31 मार्च रोजी चेन्नई आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने धोनीच्या नेतृत्वाखाली 4 वेळा IPL चे विजेतेपद पटकावले आहे. […]
ADVERTISEMENT

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सध्या एमएस धोनी (MS Dhoni) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या तयारीत व्यस्त आहे.
आयपीएल 2023 सीझनमधील पहिला सामना 31 मार्च रोजी चेन्नई आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने धोनीच्या नेतृत्वाखाली 4 वेळा IPL चे विजेतेपद पटकावले आहे.
यासाठी चेन्नईत CSK संघातील खेळाडू कर्णधार धोनीसह सराव करत आहेत.
अशा स्थितीत माहिचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचा जबरदस्त फिटनेस दिसतोय.
फोटोमध्ये धोनीचे बायसेप्स पाहून तुम्ही हैराण व्हाल. एखाद्या हिरो किंवा तरुण खेळाडूलाही फिटनेसच्या बाबतीत धोनी मागे पाडेल अशी त्याची बॉडी आहे.ॉ
यावर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं, ‘धोनीचं वय 41 वर्षे फक्त कागदावर आहे.’