T20 WC, Ind Vs Pak: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा कोण-कोण असणार संघात

मुंबई तक

Ind Vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघ 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने असतील. याच हायव्होल्टेज सामन्याच्या 24 तास आधी पाकिस्तानने आपल्या 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यापैकी 11 खेळाडूंची निवड केली जाईल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्याने अष्टपैलू शोएब मलिकचे पाकिस्तानच्या संघात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ind Vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघ 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने असतील. याच हायव्होल्टेज सामन्याच्या 24 तास आधी पाकिस्तानने आपल्या 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यापैकी 11 खेळाडूंची निवड केली जाईल.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्याने अष्टपैलू शोएब मलिकचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. तसेच मोहम्मद हाफिजसारखे वरिष्ठ खेळाडूही पाकिस्तानच्या संघात आहेत.

भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरीस रौफ, हैदर अली

हे वाचलं का?

    follow whatsapp