टीम इंडियाचे कोच रवी शास्त्रींनी घेतली कोरोनाची लस

मुंबई तक

१ मार्चपासून भारतात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील लोकांनाही कोरोनाची लस दिली जाणार आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचे कोच रवी शास्त्री यांनीही कोरोनाची लस घेतली. रवी शास्त्रींनी कोरोनाची लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट घेत, लसीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. View […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

१ मार्चपासून भारतात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील लोकांनाही कोरोनाची लस दिली जाणार आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचे कोच रवी शास्त्री यांनीही कोरोनाची लस घेतली. रवी शास्त्रींनी कोरोनाची लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट घेत, लसीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत.

यादरम्यान रवी शास्त्री यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं असून सोबतच सॅनिटायजरचा वापर करण्याचंही आवाहन केलं आहे.

५८ वर्षीय रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत अहमदाबादमध्ये आहेत. चौथ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ याच मैदानावर नंतर ५ टी-२० सामने खेळणार आहे. सध्या कसोटी मालिकेत भारत २-१ अशा आघाडीवर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी भारताला अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये विजय किंवा सामना ड्रॉ करण्याची सक्त गरज आहे.

अवश्य वाचा – चौथ्या टेस्ट मॅचसाठीही अहमदाबादमध्ये टर्निंग ट्रॅक??

हे वाचलं का?

    follow whatsapp