संजू सॅमसनला संघात स्थान नाही? कॉंग्रेसचा मोठा नेता चांगलाच भडकला

रोहिणी ठोंबरे

shashi tharoor tweet for Sanju Samson : ऑस्ट्रेलिया विरूद्धची वनडे मालिका गमावल्यावर टीम इंडियावर सडकून टीका होतेय. या मालिकेत जे खेळाडू एकाही सामन्यात बॅटीने कमाल करू दाखवू शकले नाहीयेत ते टार्गेट सापडले आहेत.यामध्ये सर्वांधिक टार्गेट सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) होतोय. सुर्यावर आता चहूबाजूंनी टिका होतेय.या सर्व प्रकरणात आता एका राजकिय नेत्याने उडी घेतली आहे. कॉग्रेस […]

ADVERTISEMENT

shashi tharoor tweet for Sanju Samson
shashi tharoor tweet for Sanju Samson
social share
google news

shashi tharoor tweet for Sanju Samson : ऑस्ट्रेलिया विरूद्धची वनडे मालिका गमावल्यावर टीम इंडियावर सडकून टीका होतेय. या मालिकेत जे खेळाडू एकाही सामन्यात बॅटीने कमाल करू दाखवू शकले नाहीयेत ते टार्गेट सापडले आहेत.यामध्ये सर्वांधिक टार्गेट सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) होतोय. सुर्यावर आता चहूबाजूंनी टिका होतेय.या सर्व प्रकरणात आता एका राजकिय नेत्याने उडी घेतली आहे. कॉग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor)यांनी सुर्यकुमार यादवच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान का दिले नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. (sanju samson didnt get chance in team india squad congress shashi tharoor angree)

सुर्याची गोल्डन ड़कची हॅट्ट्रीक

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरला आहे. त्याला तीन सामन्यातील एकही सामन्यात धावाच काढता आल्या नाही. सुर्या तीनही सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला.त्यामुळे या मालिकेत त्याने गोल्डन ड़कची हॅट्ट्रीकचा नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. खरं तर तिसऱ्या सामन्यापुर्वीच सुर्याच्या जागी संजूला संधी देण्याचे मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केले होते. मात्र तरीही सुर्याला संधी मिळाली आणि त्याने नकोसा विक्रम आपल्या नावे केला.

VIDEO: कोहली-स्टॉयनिस भिडले, मैदानातच धक्काबुक्की..नंतर घडलं असं काही…

शशी थरूर यांचे ट्विट

ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धची मालिका टीम इंडियाने (Team India) गमावल्यानंतर कॉंग्रेस नेते शशी थरूर (shashi tharoor) यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला. सुर्यकुमार यादव सलग तीन सामन्यात शुन्यावर बाद झाला. त्यामुळे क्रिकेट जगतात सलग तीन वेळा तो गोल्डन डकचा शिकार ठरलाय. त्यामुळे त्याने नकोसा विक्रम आपल्या नावे केल्याचे थरूर यांनी म्हटले.तसेच सरासरी 66 च्या स्ट्राईक रेटने वनडेत धावा करणाऱ्या संजू सॅमसन संघात का नव्हता? त्याला संघात स्थान मिळवायला आणखीण काय करावं लागेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp