Satara : अर्ध्यावर सोडली आयुष्याची ‘शर्यत’; आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटूचा धावताना मृत्यू

मुंबई तक

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी सातारा: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू असलेल्या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय दर्जेचा टेबल टेनिस खेळणारा खेळाडू म्हणून परिचित होता. अर्ध्यावरतीच सोडावी लागली आयुष्याची शर्यत यंदा प्रचंड मोठ्या संख्येत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी

सातारा: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू असलेल्या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय दर्जेचा टेबल टेनिस खेळणारा खेळाडू म्हणून परिचित होता.

अर्ध्यावरतीच सोडावी लागली आयुष्याची शर्यत

यंदा प्रचंड मोठ्या संख्येत सातारा मॅरेथॉन पार पडली. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तैनात होत्या. मॅरेथॉन सुरू होऊन एक तासही पार पडला नव्हता. तोच राजक्रांतीलाल अर्धे अंतर करून पार झालाही नव्हता तोच येवतेश्वर डोंगराच्या धावमार्गावर पडला.

तातडीने त्याला मॅरेथॉनचे मेडिकल पार्टनर असलेल्या यशवंत हॉस्पिटलला हलवले मात्र त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे काहींनी सांगितले. त्यांनंतर मृतदेह जिल्हा सरकारी दवाखान्यात हलवून शवविच्छेदन करण्यात आले पण मृत्यूचे नक्की कारण समजू शकले नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp