Sachin Tendulkar ने आजच्याच दिवशी केलेला ‘तो’ विश्वविक्रम!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sachin Tendulkar 100th international century : क्रिकेटसाठी आजचा दिवस (16 मार्च) खूप खास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आजच्याच दिवशी एक विश्वविक्रम नोंदवला गेला होता. जो कोणत्याही खेळाडूला आजपर्यंत मोडता आलेला नाही. यातील एक विक्रम शतकांचा आहे. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 100 आंतरराष्ट्रीय (100th international century) शतकं ठोकली आहेत. ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्याने आजच्या दिवशी म्हणजेच 16 मार्च 2012 रोजी बांगलादेशविरुद्ध आपले शंभरावे शतक झळकावले होते.

अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा, प्रकरण काय?

सचिनच्या 100व्या शतकाला आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात त्याने 147 चेंडूंचा सामना करत 114 धावा केल्या होत्या. आशिया चषक स्पर्धेदरम्यान मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर त्याने ही कामगिरी केली होती. सचिनचा हे वनडे सामन्यामधील 49वे शतक होते. सचिन तेंडुलकर एकदिवसीय, कसोटी अशाप्रकारे सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

100 शतक झळकावण्यासाठी सचिनचे अथक परिश्रम…

सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वात भारताची शान आहे. 100 शतकं पूर्ण करणं हे त्याच्यासाठी काही सोपं नव्हतं. त्याने अथक परिश्रम घेतले आणि रात्रंदिवस सराव केला. या विक्रमासाठी त्याला बराच काळ वाट पहावी लागली. पण 16 मार्च 2012 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शतक झळकावून त्याने 100 शतकांचा विक्रम केला.

ADVERTISEMENT

“मोदी आणि त्यांच्या बगलबच्च्यांना देश…”, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

ADVERTISEMENT

सचिनच्या या विश्वविक्रमी खेळीत सुरेश रैना आणि विराट कोहलीची अर्धशतकीय कामगिरीही महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी रैनाने 38 चेंडुंचा सामना करत 51 धावा केल्या. तसंच, 5 चौकारांसह 2 षट्कारही लगावले. कोहलीने 82 चेंडूत 66 धावा केल्या. तर, धोनीने 11 चेंडूत 21 धावा करत नाबाद राहिला होता. भारताने अशाप्रकारे एकूण 289 धावा केल्या. बांग्लादेश संघाने 5 विकेट गमावून सहज हे लक्ष्य गाठले होते. भारताचा 5 विकेटने पराभव झाला, पण सचिनच्या विक्रमामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना खास आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT