Rio मधील अपयशानंतर खेळ सोडण्याच्या विचारात होती Mirabai Chanu, Tokyo मध्ये पदक जिंकून स्वतःला केलं सिद्ध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आश्वासक सुरुवात केली आहे. ४८ किलो वजनी गटात मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई करत भारताचं खातं उघडलं. या ऐतिहासीक कामगिरीनंतर मीराबाईवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मणिपूरच्या या खेळाडूने स्नॅच आणि क्लिन अँड जर्क प्रकारात २०२ किलोचं वजन उचललं. परंतू मीराबाईचा ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. याआधी २०१६ साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही मीराबाई सहभागी झाली होती.

परंतू या स्पर्धेत तिला अपयश आलं. या अपयशानंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या मीराबाईने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतू तिच्या आईने तिला पाठींबा देत हा निर्णय घेण्यापासून थांबवलं. ४ वर्षांनी टोकियोत मीराबाईने पदकाची कमाई करत आईचा विश्वास आणि स्वतःला सिद्ध करुन दाखवलं. या पदकासाठी मी खूप मेहनत घेतल्याचंही मीराबाईने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

पाच वर्षांपूर्वी रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईने स्नॅच प्रकारात ८२ किलोचं वजन उचललं. यानंतर क्लिन अँड जर्क प्रकारात तिचे तिन्ही प्रयत्न फोल ठरले. “२०१६ रिओ ऑलिम्पिकच्या वेळी मीराबाईचा मला फोन आला आणि तिने मला निकाल सांगितला. मला ते ऐकून चक्कर आल्यासारखं झालं. आमच्या घरात सर्वजण रडत होते. मीराबाई देखील निराश झाली होती आणि तिने माझ्याकडे मी खेळणं सोडते असं सांगितंल.” मीराबाईच्या आईने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लहानपणी लाकडं गोळा करणाऱ्या हातांनी मिळवलं Olympic पदक, जाणून घ्या कोण आहे Mirabai Chanu?

परंतू यावेळी मीराबाईच्या आईने आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं रहायचं ठरवलं. “आमचा तुला पूर्णपणे पाठींबा आहे पण प्रयत्न करणं थांबवू नको. ही एक लढाई आहे आणि तू मध्येच सोडू शकत नाहीस. रौप्य पदक हे मीराबाईच्या आयुष्यात एक नवीन दिशा देणारं ठरेल अशी मला आशा आहे.” मीरबाई भारतात परत आल्यानंतर तिच्या आवडीच्या सर्व डिश तयार करुन तिला खायला देण्याची तयारी तिच्या आईने केली आहे.

ADVERTISEMENT

Tokyo Olympic 2020 : मीराबाई चानूने उघडलं पदकांचं खातं, वेटलिफ्टींग प्रकारात रौप्य पदकाची कमाई

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT