कोल्हापूरच्या ऐश्वर्याने रचला विक्रम; भारतातून 14 वर्षाखालील वयोगटात विम्बल्डनला खेळणारी एकमेव खेळाडू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सुर्यवंशी

ADVERTISEMENT

कोल्हापूर: कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड झाली. सध्या या स्पर्धेत तिची उत्तुंग कामगिरी सुरू असून महाराष्ट्राचे नाव तिच्यामुळे उंचावला आहे. भारतातून 14 वर्षाखालील वयोगटात सहभागी होणारी ती एकमेव खेळाडू असून तिच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक टेनिसपटूचे विम्बल्डनमध्ये खेळण्याचे स्वप्न असते ते ऐश्वर्याने लहान वयातच पूर्ण केले आहे. मुलीच्या हाती तिरंगा ध्वज पाहून केलेल्या कष्टाचे चीज झाल्याच्या भावना तिच्या आईने व्यक्त केल्या.

सर्वसामान्य कुटुंबातल्या ऐश्वर्या जाधव हिने जिद्ध आणि चिकाटीच्या जोरावर विम्बल्डन स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. लहान वयातच टेनिसचे बाळकडू तिच्या आई-वडिलांनी तिला दिले. कोल्हापूरच्या मेरी वेदर ग्राउंडच्या टेनिस कोर्टवर ऐश्वर्याने आपली टेनिसची कारकीर्द सुरू करत विम्बल्डन पर्यंत मजल मारली. त्यामुळे कष्टाचे चीज झाल्याचे तिची आई अंजली आणि वडील दयानंद जाधव यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हर्षद देसाई यांच्याकडे ऐश्वर्याने सुरवाततीला टेनिसचे प्रशिक्षण घेतले. एक एक स्पर्धा सर करत ती विम्बल्डन पर्यंत पोहचली आहे. कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून तिने घेतलेली उत्तुंग भरारी थक्क करणारी आहे.

ऐश्वर्याची कोल्हापुरातली तयारी या स्पर्धेसाठी उपयुक्त तर ठरली आहेच मात्र भारतीय संघानेही प्रशिक्षक देऊन तिची कामगिरी आणखी उत्तम होईल यासाठी कष्ट घेत आहेत. ऐश्वर्याने ही आता आपल्या कामगिरीकडे लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धेत दोन मॅचमध्ये तिला पराभव पत्करावा लागला असला तरी तिने केलेल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ADVERTISEMENT

कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून थेट विम्बल्डन गाठणाऱ्या ऐश्वर्याने पुन्हा एकदा कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला ऐश्वर्य मिळवून दिलं आहे. तिची या स्पर्धेतली कामगिरी काहीही होवो मात्र तिच्या रुपाने भारताला नवा टेनिस खेळाडू सापडला आहे हे मात्र नक्की… ऐश्वर्या जाधवचे वडील दयानंद जाधव हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका येवलुज गावचे रहिवासी आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी 2001 साली कोल्हापूर शहराच्या कारंडे माळ परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत सध्या या त्यांच्या घरात ऐश्वर्याने शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धामध्ये अनेक बक्षीसांची कमाई केली आहे. या बक्षीस ट्रॉफी ठेवण्यास जागा देखील नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT