India vs Pakistan, Asia Cup 2023: भारत पाकिस्तान पुन्हा भिडणार! कसं ते जाणून घ्या
Asia Cup 2023, India vs Pakistan : भारत पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने. आशिया कपमध्ये अंतिम सामना होऊ शकतो भारत आणि पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानला शेवटचा सामना 14 रोजी होणार आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर त्यांचा अंतिम फेरीत भारताशी सामना होणार आहे.
ADVERTISEMENT

Asia Cup 2023, India vs Pakistan : आशिया कप 2023 मधील सुपर-4 चा थरार शिगेला पोहोचलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना पावसात वाहून गेला. पण सुपर-4 मध्ये दुसऱ्यांदा सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यामुळे सुपर-4 च्या गुणतालिकेत उत्कंठा वाढली आहे. पण यासोबतच चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध हरवून भारत अंतिम फेरीत पोहोचणार?
क्रिकेट चाहत्यांना आता आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामनाही पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये ही टक्कर होऊ शकते. हा विजेतेपदाचा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाईल.
हेही वाचा >> विराट-राहुलचा शतकी धमाका, पाकिस्तान विरुद्धच्य सामन्यात विराट ठरला वेगवान फलंदाज
भारतीय संघाला आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 मध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. असे झाल्यास सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. दोन्ही सामन्यांचा निकाल सारखाच लागला तर अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित होईल.