Asia Cup 2023: विराट-राहुलचा शतकी धमाका, पाकिस्तान विरुद्धच्य सामन्यात विराट ठरला वेगवान फलंदाज
Ind vs Pak Asia Cup 2023 : भारताच्या विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने आजच्या दिवशी पाकिस्तानची चांगलीच धुलाई केली आहे. पावसाची कृपा झाल्यामुळे आज भारतीय संघाने शतकांचा धमका करत पाकिस्तानासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे.
ADVERTISEMENT
Ind vs Pak Asia Cup 2023 : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे आज रिजर्व्ह डेला खेळवला जात आहे. 10 सप्टेंबरला मुसळधार पावसामुळे भारतीय संघ केवळ 24.1 षटकेच खेळू शकला होता. त्यामध्ये 2 विकेट्सवर 147 धावा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज तिथूनच संघाने खेळण्यास सुरुवात केली. या सामन्यात राहुलने सहावे आणि कोहलीने वनडेतील 47 वे शतक मारले आहे.
भारताची दमदार सुरुवात
रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. तर याच सामान्यात रोहितने 49 चेंडूत 56 धावांची खेळी खेळली. यावेळी त्याने 4 षटकार आणि 6 चौकार मारले. तर शुभमन गिलने 52 चेंडूत 58 धावांची शानदार खेळी केली.
हे ही वाचा >>Ind vs Pak : कोहली, राहुलची तुफानी शतकी खेळी, पाकिस्तानसमोर ‘इतक्या’ धावांचे आव्हान
आजच्या सामन्यात शतकी खेळी
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी आजच्या सामन्यात शतकी खेळी करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी (233) भागीदारी रचली आहे. तर या दोघांनी भारताला 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 94 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या आहेत तर केएल राहुलने 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वेगळा इतिहास रचला
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी आज आपापली शतक पूर्ण करत वेगळा इतिहास रचला. या सामन्यात नसीम शाहच्या चेंडूवर दोन धावा काढून राहुलने वनडे कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केले आहे. तर विराट कोहलीने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 47 वे शतक झळकावले.
खेळातील विक्रमवीर
विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. वनडे कारकिर्दित 13 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. तर 13 हजार धावा पूर्ण करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. विराट कोहली याच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पॉटिंग आणि सनथ जयसूर्या यांनी 13 हजार धावांहून अधिक पूर्ण केल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ind vs Pak : भारत-पाक सामना रद्द! Reserve Day ला किती ओव्हर्सची मॅच होणार?
वेगवान फलंदाज
भारताची पाकिस्तानविरुद्ध वनडेतील ही संयुक्त अशी सर्वोच्च धावसंख्या आहे. कोहलीने 122 धावांची नाबाद खेळी करत त्याने 94 चेंडूंचा सामना करत नऊ चौकार आणि तीन षटकार ठोकले. कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 47 वे शतक झळकावले आणि या फॉरमॅटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT