IPL 2021: आज खेळाडूंचा लिलाव, अर्जुन तेंडुलकरवर सर्वांच्या नजरा
मुंबई: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग 2021 साठी खेळाडूंचा लिलाव आज (18 फेब्रवारी) होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या लिलावासाठी 1097 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. ज्यापैकी 292 जणांना शॉर्टलिस्ट केलं आहे. पण या लिलावात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी कोणता संघ बोली लावणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून […]
ADVERTISEMENT

मुंबई: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग 2021 साठी खेळाडूंचा लिलाव आज (18 फेब्रवारी) होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या लिलावासाठी 1097 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. ज्यापैकी 292 जणांना शॉर्टलिस्ट केलं आहे. पण या लिलावात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी कोणता संघ बोली लावणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.
आज होणाऱ्या या लिलावात आज अनेक खेळाडूंवर नजर असणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा डेव्हिड मलान, जेसन रॉय भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह, केदार जाधव याशिवाय अर्जुन तेंडुलकरवर फ्रेंचाइजी आणि क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.
आज दुपारी ३ वाजता खेळाडूंना लिलावाचं थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. तसेच या लिलावचे लाइव्ह अपडेट आपल्याला mumbaitak.in या आमच्या वेबसाइटवर देखील पाहता येणार आहे.
या लिलावासाठी 292 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. ज्यापैकी 169 खेळाडूंची बेस प्राइस ही 20 लाख रुपये आहे. तर 4 खेळाडूंची 30 लाख रुपये, 6 खेळाडूंची 40 लाख रुपये, 65 खेळाडूंची 50 लाख रुपये, 15 खेळाडूंची 75 लाख रुपये बेस प्राइस असणार आहे. याशिवाय 11 खेळाडू असे आहेत ज्यांची बेस प्राइस ही तब्बल 1 कोटी एवढी असेल. तर 12 खेळाडूंची 1.5 कोटी आणि 10 खेळाडूंची बेस प्राइस ही 2 कोटी एवढी आहे. या दहा खेळाडूंमध्ये २ भारतीय खेळाडू आहेत तर 8 परदेशी खेळाडू आहेत.