Anshuman Gaekwad : कॅन्सरशी लढणाऱ्या दिग्गजासाठी बीसीसीआय आली धावून, केली मोठी घोषणा
anshuman gaekwad health : माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. सचिव जय शाह यांनी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयचा मदतीचा हात

जय शाह यांनी पैसे देण्याचे दिले निर्देश

अंशुमन गायकवाड यांना कोणता आजार?
Anshuman Gaekwad News : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहे. अंशुमन गायकवाड यांची अवस्था पाहून कपिल देव यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. कपिल देव यांनी अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी त्यांची पेन्शन दान करण्याचा निर्णय घेतला. मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद हे मदतीसाठी धावून आले. आता त्यात बीसीसीआयनेही गायकवाड यांना मदतीचा मोठा हात दिला आहे. ()
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंशुमन गायकवाड यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अंशुमन गायकवाडच्या उपचारासाठी बीसीसीआय एक कोटी रुपये देणार आहे. Aaj Tak ने दिलेल्या वृत्तानुसार, BCCI सचिव जय शाह यांनी तातडीने 1 कोटी रुपये जारी करण्याचे निर्देश दिले. शाह यांनी अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
हेही वाचा >> भाषण करत असतानाच ट्रम्प यांच्यावर झाडल्या गोळ्या, बघा व्हिडीओ
जय शहा म्हणाले की, या संकटाच्या काळात बीसीसीआय अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करेल. बीसीसीआय गायकवाड यांच्या प्रकृतीच्या सुधारणेवर लक्ष ठेवणार आहे. ते या आजारातून बाहेर पडतील, असा विश्वास बीसीसीआयला आहे.
अंशुमन गायकवाड यांची क्रिकेट कारकीर्द
अंशुमन गायकवाड यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ते शेवटचा कसोटी सामना 1984 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळले होते. कोलकातामध्ये हा सामना झाला होता.