big bash league : गोलंदाजांनी घडवला इतिहास, अवघ्या 15 धावात संपूर्ण संघ गारद!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग टी20 क्रिकेट स्पर्धेत इतिहास घडला. बिश बॅग लीगमध्ये सिडनी थंडर्ससाठी आजचा दिवस मानहानीकारक पराभवाचा ठरला. BBL मध्ये झालेल्या सामन्यात एडिलेट स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजाचा धुरळा उडवला. एडिलेट स्ट्रायकर्सच्या भेदक गोलंदाजीसमोर सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ 15 धावात तंब्बूत परतला. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.

बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात क्रिकेट रसिकांना अविश्वसनीय सामना बघायला मिळाला. बिग बॅश लीग च्या पाचव्या सामन्यात आज एडिलेट स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी कमाल केली. सिडनी थंडर्स आणि एडिलेट स्ट्रायकर्स यांच्यात सामना झाला.

सिडनीतील मैदानावर झालेल्या या सामन्यात एडिलेट स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना एडिलेट स्ट्रायकर्सने 9 गडी गमावत 139 धावा केल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

big bash league : हेनरी आणि एगरचा भेदक मारा

एडिलेट स्ट्रायकर्सने 20 षटकात 139 धावाचं आव्हान दिल्यानंतर सिडनी थंडर्स सहज मिळवेल असंच चित्र होतं. मात्र, एडिलेट स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी सामन्याचा निकालच बदलून टाकला. इतकंच नाही, तर टी20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.

ADVERTISEMENT

एडिलेट स्ट्रायकर्सचे जलदगती गोलंदाज हेनरी थॉर्टन आणि वेस एगर यांनी भेदक मारा केला. दोघांच्या माऱ्यासमोर सिडनी थंडर्सच्या फलंदाजांचा निभावच लागला नाही. दोघांनी मिळून सिडनी थंडर्सच्या 9 फलंदाजांना माघारी पाठवले.

ADVERTISEMENT

सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ 5.5 षटकात म्हणजे अवघ्या 35 चेंडूच खेळू शकला. अवघ्या 15 धावात सिडनी थंडर्सचा सगळा संघ माघारी परतला. एडिलेट स्ट्रायकर्सने हा सामना तब्बल 124 धावांनी जिंकला. हेनरीला प्लेअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आलं. हेनरी 2.5 षटकात 3 धावा देत 5 गडी बाद केले. एगरने 2 षटकात 6 धावा देत 4 गडी बाद केले.

सिडनी थंडर्सचे फलंदाजांनी टाकल्या नांग्या

सिडनी थंडर्सच्या एकही फलंदाजाला 10 धावाही करता आल्या नाही. सिडनी थंडर्सचे खेळाडू 0,0,3,0,2,1,1,0,0,4,1 अशा धावा करून बाद झाले. सिडनी थंडर्सच्या सलामीवीरांना खातेही उघडता आले नाही.

सिडनी थंडर्सच्या नावे मानहानीकारक इतिहास

सिडनी थंडर्सचा संघ 15 धावात बाद झाल्याने त्यांच्या नावे मानहानीकारक इतिहास नोंदवला गेलाय. सिडनी टीमने टी 20 फॉर्मेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या केली. सिडनी संघाने तीन वर्षांपूर्वी टर्की संघाच्या नावे असलेला रिकॉर्ड तोडला. टर्की संघाने 30 ऑगस्ट 2019 रोजी चेक रिपब्लिक विरुद्धच्या सामन्यात 8.3 षटकात 21 धावाच केल्या होत्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT