ब्रिस्बेन शहराला 2032 Olympic च्या यजमानपदाचा मान
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०३२ सालच्या स्पर्धेसाठी यजमानपदाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहराला २०३२ सालच्या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. मेलबर्न आणि सिडनी यांच्यानंतर ऑलिम्पिक यजमानपदाचा मान मिळवणारं ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियातलं तिसरं शहर ठरलं आहे. २००० साली सिडनीत ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या, यानंतर ३२ वर्षांनी […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०३२ सालच्या स्पर्धेसाठी यजमानपदाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहराला २०३२ सालच्या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. मेलबर्न आणि सिडनी यांच्यानंतर ऑलिम्पिक यजमानपदाचा मान मिळवणारं ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियातलं तिसरं शहर ठरलं आहे.
ADVERTISEMENT
२००० साली सिडनीत ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या, यानंतर ३२ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियात भरवल्या जाती. १९५६ साली मेलबर्न शहरात पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रेलियात स्पर्धेचं आयोजन यशस्वी पद्धतीने करण्यासाठी काय तयारी करावी लागेल याची आम्हाला जाणीव आहे असा विश्वास ऑस्ट्रेलियाचं पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी IOC सोबत झालेल्या व्हिडीओ कॉलमध्ये बोलून दाखवला.
यानंतर ७२ विरुद्ध ५ मताने यजमानपदाचे हक्क ब्रिस्बेन शहराला बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही आपले दोन्ही हात उंचावत आनंद व्यक्त केला.
हे वाचलं का?
BRISBANE 2032 ELECTED AS HOST OF THE GAMES OF THE XXXV OLYMPIAD!
CONGRATULATIONS! pic.twitter.com/h66C9pHxcG
— IOC MEDIA (@iocmedia) July 21, 2021
टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्यानंतर २०२४ साली पॅरीस, २०२८ साली लॉस एंजलिस आणि २०३२ साली ब्रिस्बेन शहरात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT