CSK vs DC : चेन्नईकडून दिल्ली फतेह! प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान

मुंबई तक

ADVERTISEMENT

chennai super kings qualified for ipl 2023 playoffs
chennai super kings qualified for ipl 2023 playoffs
social share
google news

Chennai super kings qualified for ipl 2023 playoffs : आय़पीएलच्या आजच्या सामन्यात दिल्लीचा (delhi capitals) 77 धावांनी पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने (chennai super kings) प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं आहे. यंदाच्या हंगामात गुजरात नंतर प्लेऑफमध्ये स्थान पटकावणारी चेन्नई सुपर किंग्ज ही दुसरी टीम ठरली आहे.याचबरोबर आयपीएलच्या गेल्या 15 हंगामात चेन्नईने 12 व्यांदा प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं आहे. त्यामुळे चैन्नई आता यंदाच्या ट्रॉफीवर नाव कोरते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (chennai super kings qualified for ipl 2023 playoffs beat delhi capitals csk vs dc)

ADVERTISEMENT

दिल्लीविरूद्धच्या (delhi capitals) सामन्यात चेन्नईचा (chennai super kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे मैदानात उतरले होते. दोघांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाडने 50 बॉलमध्ये 79 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 7 षटकार लगावले. तसेच डेवॉन कॉन्वेने देखील 52 बॉलमध्ये 87 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. यानंतर चेन्नईकडून इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात शिवम दुबे मैदानात उतरला होता.मात्र त्याने हवी तशी साजेशी खेळी केली नाही. 9 बॉलमध्ये त्याने 22 धावा केल्या. सामन्याच्या अंतिम टप्प्यात एम एस धोनी आणि रविंद्र जडेजा मैदानात होते. यामध्ये धोनी पाचच धावा केल्या. तर जड्डूने 7 बॉलमध्ये 20 धावा केल्या. या धावांच्या जोरावर चेन्न्ईने 20 ओव्हरमध्ये 223 धावांचा डोंगर उभारला होता.

हे ही वाचा : विराट कोहलीमुळे वाढलं रोहित शर्माचे टेन्शन!

दिल्लीसमोर 224 धावांचे आव्हान

चेन्नईने दिलेल्या 224 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉच्या रूपात दिल्लीला पहिला झटका बसला. पृथ्वी अवघ्या पाच धावा करून बाद झाला. पृथ्वीच्या विकेटनंकर दिल्लीचे एका मागून एक विकेट पडतच होते, तर दुसऱ्या बाजूला डेविड वॉर्नरने एका बाजूने डाव सांभाळला होता. मात्र विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच होता.डेविड वॉर्नरने कर्णधार साजेशी खेळी केली. वॉरर्नरने 58 बॉलमध्ये 86 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार लगावले. वॉर्नर व्यतिरीक्त एकाही खेळाडूला मोठी धावा करता आली नाही. त्यामुळे दिल्लीचा डाव 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 146 धावांपर्यंतच मजल मारू शकला.त्यामुळे चेन्नईने 77 धावांनी हा सामना जिंकला.

हे वाचलं का?

दरम्यान चेन्नईचा हा ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना होता. त्यामुळे दिल्लीविरूद्ध विजयासह चेन्नई प्लेऑफमध्ये दाखल झाली आहे. चेन्नईचे 14 सामन्यात 17 पॉईट्स आहेत, तर दिल्लीचे 14 सामन्यात 8 पॉईट्स आहेत. दरम्यान आता चेन्नई प्लेऑफमध्ये दाखल झाल्याने आता आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरते के हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : वडील आयसीयूमध्ये अन् त्याने गाजवलं मैदान; मोहसीन का झाला भावूक?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT