WTC Final : पावसाच्या खेळखंडोब्यानंतर केविन पिटरसन म्हणतो, महत्वाचे सामने इंग्लंडमध्ये खेळवूच नका !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यात चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्यामुळे दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. आतापर्यंत ४ दिवसांपैकी २ दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे क्रिकेटप्रेमींची चांगलीच निराशा झाली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने याबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नाराजी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

हे बोलत असताना मला त्रास होतोय, पण इंग्लंडमध्ये कोणत्याही महत्वाच्या सामन्यांचं आयोजन करायला नको. जर माझ्या हातात असतं तर WTC चा अंतिम सामना दुबईत खेळवता आला असता. त्रयस्थ मैदान, उत्तम स्टेडीअम, चांगलं हवामान आणि सरावाची चांगली सोय अशा सर्वच गोष्टी जुळून येतात, असं पिटरसनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटलंय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप च्या अंतिम सामन्यात आयोजनात झालेला हा ढिसाळपणा पाहून सोशल मीडियावर चाहतेही आयसीसीवर नाराज आहेत. सलग दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यामुळे क्रिकेटप्रेमींना या सामन्याचा आनंदही घेता आला नाहीये.

हे वाचलं का?

WTC Final : चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, Ind vs NZ सामना अनिर्णित अवस्थेकडे

काएल जेमिसनच्या ५ विकेटच्या जोरावर न्यूझीलंडने भारताची पहिली इनिंग २१७ रन्सवर संपवली. प्रत्युत्तरादाखल तिसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने २ विकेट गमावत १०१ रन्सपर्यंत मजल मारली. आयसीसीने या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद केली आहे. आतापर्यंत वाया गेलेले दिवस पाहता हा सामना राखीव दिवसापर्यंत खेळवला जाईल असंच चित्र सध्या दिसत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT