एमएस धोनीने चुकवला सगळ्यांचाच अंदाज! आयपीएल निवृत्ती नाही, तर केली वेगळीच घोषणा
भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने रविवारी आपण लाईव्ह येऊन महत्वाची माहिती देणार असल्याचं घोषित केलं होतं. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होतं. पण तसं काही घडले नाही. अशाप्रकारे या 41 वर्षीय दिग्गज खेळाडूच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. खरंतर धोनीने ओरियो बिस्किट भारतात लाँच केले आहे. धोनीला 2022 […]
ADVERTISEMENT
भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने रविवारी आपण लाईव्ह येऊन महत्वाची माहिती देणार असल्याचं घोषित केलं होतं. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होतं. पण तसं काही घडले नाही. अशाप्रकारे या 41 वर्षीय दिग्गज खेळाडूच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. खरंतर धोनीने ओरियो बिस्किट भारतात लाँच केले आहे. धोनीला 2022 च्या T20 विश्वचषकाशीही त्याचा संबंध जोडला आहे.
ADVERTISEMENT
धोनीने शनिवारी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक माहिती दिली की, तो 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता एक रोमांचक बातमी शेअर करण्यासाठी लाईव्ह येईल. त्यामुळे अनेकांना उत्सुकता लागली होती. धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशा देखील चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र धोनीने येऊन वेगळीच माहिती दिली.
धोनी लाईव्ह आला आणि म्हणाला
हे वाचलं का?
एमएस धोनी लाइव्ह येऊन म्हणाला, ओरियो यावेळी आम्हाला वर्ल्डकप जिंकूवू शकतो. २०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकण्यापूर्वी ओरिओ लॉन्च करण्यात आला होता. जर ओरिओ पुन्हा लॉन्च झाला तर यावर्षी भारत चषक जिंकेल. आता कनेक्शन साफ झाले आहे. चला Oreo पुन्हा लाँच करू. भारतात प्रथमच Oreo सादर करत आहे. मी पुन्हा 2011 परत आणत आहे. इतिहास घडवण्यासाठी आणि त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हीही पुढे यावे, असं धोनी म्हणाला.
धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती
ADVERTISEMENT
एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड विरुद्ध 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळला. 41 वर्षीय एमएस धोनीने 350 एकदिवसीय, 98 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 90 कसोटी सामन्यांमध्ये 17266 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 108 अर्धशतके आणि 16 शतके झळकावली.
ADVERTISEMENT
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन वेळा आयसीसी विजेतेपद मिळवण्यात यश आले. त्याचबरोबर त्याने सीएसकेला आयपीएलमध्ये चार वेळा चॅम्पियन बनवले आहे. अलीकडेच CSK व्यवस्थापनाने धोनीच्या IPL 2023 मध्ये खेळण्याची पुष्टी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT