"गौतम गंभीर जास्त दिवस टिकणार नाही, कारण...", माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

गौतम गंभीरच्या कार्यकाळाबद्दल जोगिंदर शर्माला काय वाटतं?
गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून जास्त काळ राहणार नाही, असे शर्माने म्हटले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गौतम गंभीरच्या स्वभावाबद्दल मोठे विधान

point

जोगिंदर शर्माने गौतम गंभीरबद्दल काय बोलला?

point

गौतम गंभीर कधीपर्यंत असणार मुख्य प्रशिक्षक?

Gautam Gambhir News : 2007 च्या टी २० वर्ल्ड कपमधील हिरो जोगिंदर शर्माने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर जास्त दिवस टिकणार नाही, असे जोगिंदर शर्माने म्हटले आहे. यामागील कारणही त्याने सांगितले आहे. (Joginder Sharma has said that Gautam Gambhir, the head coach of Team India, will not last long)

ADVERTISEMENT

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जोगिंदर शर्मा गौतम गंभीरबद्दल बोलला आहे. त्याने गौतम गंभीरच्या स्वभावाबद्दलही भाष्य केले. 

गौतम गंभीर टीम इंडियाला सांभाळेल, पण...

जोगिंदर शर्मा म्हणाला की, "गौतम गंभीर संघाला सांभाळेल, पण माझे असे मत आहे की, गंभीर जास्त काळ टिकणार नाही. कारण गौतम गंभीरचे स्वतःचे काही निर्णय असतात. असे होऊ शकते की, कुठल्या खेळाडूसोबत वाद होईल. मी विराट कोहलीबद्दल बोलत नाहीये. गंभीरचे निर्णय अनेकदा असे असतात की, दुसऱ्यांना आवडत नाही."

हे वाचलं का?

हेही वाचा >> सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा

जोगिंदर शर्मा पुढे म्हणाला, "गौतम गंभीर स्पष्टवक्ता आहे. तो कुणाकडे जाणारा नाहीये. गौतम गंभीर हुजरेगिरी करणारा माणूस नाही. त्याला श्रेय देणारे आम्ही लोक आहोत. तो त्याचे काम करतो. मनापासून आणि प्रामाणिकपणे करतो."

राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरला मिळाली जबाबदारी

टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षण पदाची जबाबदारी राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर सोपवण्यात आली आहे. गंभीर मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने पहिल्या मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "...म्हणून देवेंद्र फडणवीसांनी 'तो' रिपोर्ट दडवून ठेवलाय" 

गौतम गंभीर प्रशिक्षक पदाचा करार 2027 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत आहे. या काळात टीम इंडिया 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2026 मध्ये टी 20 वर्ल्ड कप आणि 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT