Glenn Maxwell : वेदनेने कासावीस, तरीही खेळला; मॅक्सवेलने मोडला कपिल देव यांचा विक्रम
अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद २०१ धावांची खेळी करत ग्लेन मॅक्सवेलने भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला.
ADVERTISEMENT

Glenn Maxwell Double Century Records: यश लढणाऱ्यांच्या पायाशी लोळण घेते असं म्हणतात याची प्रचिती मंगळवारी (7 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात. 91 धावांतच 7 गडी गमावलेनंतर विजयाच्या सगळ्या आशा मावळल्या होत्या. त्याच वेळी ग्लेन मॅक्सवेल आला अन् नंतर जे घडलं ते क्रिकेटप्रेमींनी बघितलं. दुहेरी शतक झळकावतानाच ग्लेन मॅक्सवेलने तब्बल 11 विश्वविक्रम आपल्या नावे केले.
भारतात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध 128 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी करत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने आपल्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकार मारले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही केला आहे. याशिवाय त्याने अनेक मोठे विक्रमही केले.
वेदनेने कण्हत असलेल्या मॅक्सवेलने मानली नाही हार आणि जिंकला
मुंबईतील वानखेडे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 292 धावांचे लक्ष्य दिले. कांगारूंनी 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. यासोबतच दोन मोठे विक्रमही झाले आहेत. वानखेडेवरील एकदिवसीय सामन्यातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग केला आहे.
हे ही वाचा >> World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये भिडणार? जाणून घ्या समीकरण
फलंदाजी करताना मॅक्सवेलने पाठदुखीची तक्रारही केली होती. तसेच हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाली. पण मॅक्सवेलने संपूर्ण सामना लंगडत खेळला. तो मैदानाबाहेर गेला नाही. जबरदस्त उत्साह दाखवत त्याने आपल्या संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.