GT vs CSK IPL 2023: गुजरात टायटन्सविरुद्ध CSK च्या पराभवाची 5 कारणं

मुंबई तक

ADVERTISEMENT

IPL 2023: 5 big reasons why csk is losing against gujarat titans
IPL 2023: 5 big reasons why csk is losing against gujarat titans
social share
google news

GT vs CSK: अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL)16व्या हंगामाची शुक्रवारी (31 मार्च) शानदार सुरुवात झाली. या मोसमातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेला, त्यात गुजरातला आठ धावा करायच्या होत्या. तुषार देशपांडेच्या त्या षटकात राहुल तेवतियाने एक षटकार आणि एक चौकार मारून विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पराभवामागे अनेक कारणे होती. चला जाणून घेऊया त्या पाच मुख्य कारणांबद्दल ज्यांच्यामुळे CSK ला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला.

चेन्नईच्या पराभवाची 5 कारणं

1. स्टोक्स-कॉनवे फ्लॉप: चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाडने शानदार 92 धावा केल्या. याशिवाय बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. सीएसकेसाठी दुसरी सर्वोत्तम धावसंख्या मोईन अलीची होती ज्याने 23 धावा केल्या. बेन स्टोक्स, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू यांसारखे खेळाडू विशेष काही करू शकले नाहीत. बेन स्टोक्सकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सात धावांवर तो राशिद खानचा बळी ठरला. ऋतुराज व्यतिरिक्त इतर कोणी 40 धावा केल्या असत्या तर CSK 200 च्या जवळ पोहोचू शकले असते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अधिक वाचा- CSK vs GT : गुजरात टायटन्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त

2. टॉस हरणं पडलं महागात: सामन्यात CSK च्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे टॉस हरणं. गुजरात टायटन्स फलंदाजी करत असताना मैदानावर भरपूर दव असल्याने त्यांना फलंदाजी करणं सोपं गेलं. CSK कर्णधार एमएस धोनीनेही ‘ड्यू फॅक्टर’ मान्य केला.

3. इम्पॅक्ट फ्लेअर अपयशी: यावेळी आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट फ्लेअर नियम’ वापरला जात आहे. गुजरात टायटन्सच्या डावादरम्यान, सीएसकेने वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला इम्पॅक्ट फ्लेअर म्हणून मैदानात उतरवले. CSK चा हा डाव फसला. कारण तुषार देशपांडेने 3.2 षटकात तब्बल 51 धावा दिल्या.

ADVERTISEMENT

4. स्वैर गोलंदाजी: चेन्नईचे गोलंदाजही या सामन्यात शिस्तबद्ध दिसले नाहीत. दोन नो-बॉल टाकणे देखील संघाला महागात पडले. कारण गुजरातच्या फलंदाजांनी फ्री हिटचा फायदा घेत षटकार आणि चौकार मारले. सीएसकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली असती तर त्याचा परिणाम अधिक चांगला होऊ शकला असता.

ADVERTISEMENT

अधिक वाचा- CSK vs GT : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची कमाल!, IPLच्या पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्यूरी

5. शुभमन गिलला लवकर बाद करणं गरजेचं: चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलची चमकदार कामगिरी. शुभमन गिलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. 63 धावा करून गिल बाद झाला तोपर्यंत सामना गुजरात टायटन्सच्या हातात गेला होता. गिलला लवकर बाद करणं हे अत्यंत गरजेचं होतं. मात्र, चेन्नईला ते जमलं नाही.

चेन्नई सुपरकिंग्ज वि. गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यावर एक नजर

आयपीएलच्या 16 व्या सीजनमधील पहिल्याच सामन्याबद्दल बोलायचे झाले तर CSK ने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सात विकेट्सवर 178 धावा केल्या. यावेळी ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 9 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. याशिवाय मोईन अलीने 23 आणि शिवम दुबेने 19 धावा केल्या. कर्णधार धोनीनेही एक षटकार आणि एक चौकार मारत नाबाद 14 धावा केल्या. गुजराततर्फे रशीद खान, अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

अधिक वाचा- CSK VS GT, IPL 2023: पहिला सामना खेळण्याचा कुणाला होणार फायदा? इतिहास काय?

गुजरातने 179 धावांचे लक्ष्य चार चेंडू राखून पूर्ण केले. सामन्याच्या शेवटच्या दोन षटकात गुजरातला 23 धावा करायच्या होत्या, अशा परिस्थितीत राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी शानदार खेळ दाखवत चेन्नईवर शानदार विजय मिळवला. तेवतियाने 15 नाबाद खेळी खेळली आणि रशीदने 10 धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याचवेळी विजय शंकरने 27 आणि ऋद्धिमान साहाने 25 धावा केल्या. तर रशीद खान हा सामनावीर ठरला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT