Ind vs NZ : आम्ही दबावाखाली होतो, कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर द्रविडचं मोठं विधान
न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघाला हातातोंडाशी आलेला विजयाचा घास सोडून द्यावा लागला आहे. अखेरच्या दिवशी विजयासाठी केवळ एक विकेट हवी असताना रचिन रविंद्र आणि एजाज पटेल जोडीने उर्वरित ओव्हर्स खेळून काढत सामना अनिर्णित राखला. या निकालानंतर सोशल मीडियावर चौथ्या दिवशी साहा आणि पटेल जोडीने केलेला स्लो खेळ आणि डाव घोषित करण्यासाठी झालेला उशीर यामुळे […]
ADVERTISEMENT

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघाला हातातोंडाशी आलेला विजयाचा घास सोडून द्यावा लागला आहे. अखेरच्या दिवशी विजयासाठी केवळ एक विकेट हवी असताना रचिन रविंद्र आणि एजाज पटेल जोडीने उर्वरित ओव्हर्स खेळून काढत सामना अनिर्णित राखला.
या निकालानंतर सोशल मीडियावर चौथ्या दिवशी साहा आणि पटेल जोडीने केलेला स्लो खेळ आणि डाव घोषित करण्यासाठी झालेला उशीर यामुळे सामना भारताने गमावल्याची चर्चा सुरु झाली. भारतीय संघाचा नवनिर्वाचीत कोच द्रविडने मात्र याबद्दल वेगळीच प्रतिक्रीया दिली आहे.
माझ्या मते दुसरा डाव घोषित करायला झालेला उशीर हे त्यासाठीचं कारण असू शकत नाही. ज्या क्षणी आम्ही दुसरा डाव घोषित केला त्याच्या अर्धा तास आधी आम्ही दबावाखाली होतो. त्याक्षणी तिन्ही निकाल लागणं शक्य होतं. मानेला झालेली दुखापत घेऊनही वृद्धीमान साहा खूप चांगल्या पद्धीतीने धैर्य दाखवून खेळला. पण त्या क्षणी जर आम्ही शेवटच्या तीन विकेट लवकर गमावून बसलो असतो तर न्यूझीलंडला विजयासाठी तुलनेने सोपं आव्हान मिळालं असतं.
भारताने आपला दुसरा डाव वेळेतच घोषित केला. तुम्ही पाहिलंच असेल की ही खेळपट्टी खूपच फ्लॅट होती. जर खेळपट्टीत थोडासा बाऊन्स असता किंवा बॉल टर्न होत असता तर गोष्ट वेगळी होती असंही द्रविडने सांगितलं.