HardiK Pandya : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

hardik pandya fitness update mumbai indias captain afganistan t20i series ipl 2024
hardik pandya fitness update mumbai indias captain afganistan t20i series ipl 2024
social share
google news

Hardik Pandya Fitness Update : रोहित शर्माला (Rohit sharma) कर्णधार पदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) टीकेचा वर्षाव होत आहे. या दरम्यान हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे आयपीएल 2024 (IPL 2024) मधून बाहेर पडणार असल्याचेही वृत्त हाती आले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. असे असताना आता मुंबई इंडियन्ससाठी मोठी खुशखबर हाती आली आहे. आणि ही खुशखबर हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत आहे. नेमकी हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत काय वृत्त आहे, हे जाणून घेऊयात. (hardik pandya fitness update mumbai indias captain afganistan t20i series ipl 2024)

ADVERTISEMENT

हार्दिक पांड्याला वर्ल्ड कप दरम्यान पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो सध्या क्रिकेटपासून दुर आहे. या दरम्यान मुंबई इडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाची धुरा दिली होती. असे असताना हार्दिक पांड्या आयपीएलमधून बाहेर होणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्या आता पुर्णपणे फिट झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : Maharashtra Opinion Poll 2024 : मविआला लोकसभेच्या 28 जागा, महायुतीची झोप उडवणारा पोल!

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पांड्याच्या पायाच्या घोट्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे. तो दररोज सराव करत असून पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तसेच टीम इंडियाला नवीन वर्षात 11 जानेवारीपासून घरच्या मैदानावर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. तोपर्यंत पांड्या पूर्णपणे बरा होईल आणि तो कर्णधारही दिसेल. यानंतर आयपीएल 2024 चा हंगाम मार्च ते मे दरम्यान होणार आहे. त्यानंतर पंड्या मुंबईचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.तसेच पांड्या 2024 च्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. आयपीएलला अजून चार महिने बाकी आहेत.तिथपर्यंत हार्दिक पांड्या हमखास मैदानात वापसी करेल.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maratha Reservation : क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली! CM शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन, ‘वकिलांची फौज…’

दरम्यान वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्याचे लिगामेंट फाटले होते. त्यामुळे हार्दिकला विश्वचषक अर्ध्यावर सोडावा लागला होता. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेलाही त्याला मुकावे लागले होते. एवढेच नाही तर हार्दिक दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा भागही नव्हता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT