Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : नताशा- हार्दिक पंड्याचा घटस्फोट,चार वर्षांचा संसार मोडला

मुंबई तक

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्या घटस्फोट घेणार आहेत. खुद्द क्रिकेटरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही विभक्त होणार असल्याच्या बातम्या येत होत्या.

ADVERTISEMENT

हार्दीक पंड्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिला आहे.
hardik pandya natasha stankovic divorce cricket confirm shared instagram post
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हार्दिक-नताशाचा चार वर्षांचा संसार मोडला

point

दोघांनी परस्पर संमतीने घेतला विभक्त होण्याचा निर्णय

point

हार्दिक पंड्याने इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) घटस्फोट घेणार आहेत. हार्दिक पंड्यानेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या 4 वर्षापासून दोघेही नात्यात होते. त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा देखील आहे. आता दोघांनी परस्पर समितीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दीक पंड्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिला आहे. (hardik pandya natasha stankovic divorce cricket confirm shared instagram post) 

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून हार्दिक पंड्या प्रचंड ट्रोल झाला होता.त्यानंतर टी20 वर्ल्ड कप दरम्यान हार्दिक पंड्या यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. नताशाने हार्दिकला अनफॉलो केले होते. त्याचसोबत वर्ल्ड कपच्या एकही सामन्यात नताशा हार्दिकला स्टेडिअममध्ये चिअर करताना दिसली नव्हती. त्यामुळे हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळत नव्हता. अखेर आज हार्दिकने इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून विभक्त होणार असल्याची माहिती दिली आहे 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : 'या' कागदपत्रात मिळाली मोठी सूट, आली नवीन अपडेट

पंड्याची पोस्ट जशीच्या तशी...

हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहले की, गेली चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता, एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास, जे काही आम्ही एकत्र घालवले आणि आनंद लुटला, आम्ही एक कुटुंब म्हणून पुढे गेलो, असे हार्दिक पंड्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतोय.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp