हिटमॅनच्या नेतृत्वात टीम इंडिया चमकली, ६ वर्षांनी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करत वन-डे पाठोपाठ टी-२० मालिकाही ३-० च्या फरकाने जिंकली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आली आहे. तब्बल ६ वर्षांनी भारतीय संघाला टी-२० क्रमवारीत पहिलं स्थान मिळवण्याची संधी मिळाली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आला होता. […]
ADVERTISEMENT
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करत वन-डे पाठोपाठ टी-२० मालिकाही ३-० च्या फरकाने जिंकली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आली आहे. तब्बल ६ वर्षांनी भारतीय संघाला टी-२० क्रमवारीत पहिलं स्थान मिळवण्याची संधी मिळाली आहे.
ADVERTISEMENT
फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आला होता. इंग्लंडच्यया ओएन मॉर्गनच्या टीमला रोहित शर्माच्या भारतीय संघाने खाली खेचलं आहे. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीमध्येच संपुष्टात आलं. परंतू त्यानंतर भारतीय संघ सलग ९ टी-२० सामने जिंकला आहे. या कामगिरीच्या जोरावर भारताच्या खात्यात २६९ गुण जमा झाले आहेत.
अशी आहे आयसीसीची टी-२० क्रमवारी –
हे वाचलं का?
१) भारत – २६९
२) इंग्लंड – २६९
ADVERTISEMENT
३) पाकिस्तान – २६६
ADVERTISEMENT
४) न्यूझीलंड – २५५
५) दक्षिण आफ्रिका – २५३
६) ऑस्ट्रेलिया – २४९
७) वेस्ट इंडिज – २३५
८) अफगाणिस्तान – २३२
९) श्रीलंका – २३१
१०) बांगलादेश – २३१
साहाची द्रविडवर नाराजी तरीही प्रामाणिक उत्तर देत ‘द वॉल’ ने जिंकलं फॅन्सचं मन
वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात असून दोन्ही संघ यात ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळतील.
IND vs WI T20 : ‘सूर्य’कुमार तळपला! वेस्ट इंडिजला टी-20 मालिकेतही व्हाईटवॉश
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT