ICC Test Ranking : टॉप 10 सोडाच! टेस्ट रॅकींगमध्ये विराट कोहलीने गमावलं स्थान
ICC Test Ranking : इंटरनेशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) बुधवारी टेस्ट रॅकींग जाहिर केली आहे. या टे्स्ट रॅंकींगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरश लाज घालवली आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC) टीम इंडियाकडून खेळलेला एकही खेळाडू टॉप टेनमध्ये स्थान पटकावू शकला नाही.
ADVERTISEMENT
ICC Test Ranking : इंटरनेशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) बुधवारी टेस्ट रॅकींग जाहिर केली आहे. या टे्स्ट रॅंकींगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरश लाज घालवली आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC) टीम इंडियाकडून खेळलेला एकही खेळाडू टॉप टेनमध्ये स्थान पटकावू शकला नाही. रिषभ पंत टॉप टेनमध्ये आहे, मात्र तो WTC खेळला नव्हता. टेस्ट रॅकींगमध्ये विराट कोहली टॉप टेनमध्ये आधीच नव्हता त्यात आता त्यांनी आणखीण एक स्थान गमावले आहे. त्यामुळे विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. (icc test ranking joe root first position virat kolhi loose ravichandran ashwin no 1 bowler ravindra jadeja)
ADVERTISEMENT
फलंदाजीत जो रूट एक नंबर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप आणि अॅशेस मालिकेचा टेस्ट रॅकींगवर मोठा परिणाम झाला आहे. कारण फलंदाजीत इंग्लंडच्या जो रूटने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनला पछाडून फलंदाजीत पहिला क्रमांत पटकावला आहे. अॅशेस मालिकेपुर्वी जो रूट पाचव्या स्थानी होता.मात्र त्याने ऑस्ट्रलिया विरूद्धच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडकडून पहिल्या डावात 118 धावा करून शतक ठोकलं तर दुसऱ्या डावात त्याने अवघ्या 46 धावा केल्या होत्या. जो रूटच्या या खेळीने त्याने पाचव्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
हे ही वाचा : Odi World Cup 2023 : वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, ‘ही’ मागणी फेटाळली
विराट-रोहित कितव्या स्थानी?
जो रूट 887 गुणांसह टेस्ट रॅकींगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी 883 गुणांसह केन विल्यमसन दुसऱ्या स्थानी आहे. मार्नस लाबुशेन 877 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. टॉप टेनमध्ये टीम इंडियाचा फक्त ऋषभ पंतच आहे. ऋषभ पंत 758 गुणांसह 10 व्या स्थानी आहे. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 729 गुणांसह बाराव्या स्थानी आहे. विराट कोहलीने तर एक स्थान गमावलं आहे. विराट 700 गुणांसह 14 व्या स्थानी आहे. विराट कोहलीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये् बॅट तळपली नव्हती, त्याचा परीणाम टेस्ट रॅकींगमध्ये दिसून आला.
हे वाचलं का?
जडेजा-अश्विनची जोडी रॅकींगमध्ये कायम
टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन गोलंदाजीत पहिल्या स्थानी आहे. अश्विन 860 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर अश्विन व्यतिरीक्त टॉप टेनमध्ये 772 गुणांसह जसप्रीत बुमराह 8 व्या स्थानी आहे. यानंतर 9 व्या स्थानी 765 गुणांसह रविंद्र जडेजा आहे.
ऑलराऊंडर रॅकींगमध्ये भारतचा दबदबा
ऑलराऊंडर खेळाडूंची रॅकींग पाहिल्यास रविंद्र जडेजाने भारताचा मान राखला आहे. रविंद्र जडेजा 434 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर 352 गुणांसह रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी बांगलादेशचा शकीब अल हसन आहे.त्याचे गुण 332 आहे. आणि चौथ्या स्थानी 310 गुणांसह अक्षर पटेल आहे. ऑलराऊंडर टेस्ट रॅकींगमध्ये भारताचा दबदबा दिसून आला आहे.कारण टॉप 5 मध्येच 3 भारतीय खेळाडू आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘…तर भारतात वर्ल्डकपही खेळणार नाही’, जावेद मियादादने बीसीसीआयला डिवचलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT