World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये भिडणार? जाणून घ्या समीकरण
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (odi world cup 2023) भारतीय संघाची विजयी वाटचाल शानदार शैलीत सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) आपल्या 8व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे.
ADVERTISEMENT
India vs Pakistan World Cup Semi final Scenario: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (odi world cup 2023) भारतीय संघाची विजयी वाटचाल शानदार शैलीत सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) आपल्या 8व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. हा सामना रविवारी (5 नोव्हेंबर) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. (In World Cup 2023 Will India-Pakistan clash in the semi-finals get know about equation and scenario)
ADVERTISEMENT
या विजयासह भारतीय संघाने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान निश्चित केले आहे. यासह, ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील, जिथे ते पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी स्पर्धा करतील. यावेळीही असं झालंच तर, नंबर 4 हा पाकिस्तानचा संघ असू शकतो. पण असे होणे फार कठीण वाटत आहे.
वाचा : IND vs SA : जडेजाचा ‘पंच’, आफ्रिकेचं लोटांगण! ‘इंडिया’ने असा साकारला अविस्मरणीय विजय
चौथ्या स्थानासाठी 3 संघांमध्ये स्पर्धा
भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल फेरीचा सामना खेळणार आहे, जो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चौथ्या क्रमांवर असलेल्या संघासोबत खेळवला जाईल. ही सेमीफायनल फेरी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून खेळली जाईल. तर सध्या न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चौथ्या क्रमांकासाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे.
हे वाचलं का?
सध्याच्या परिस्थितीत न्यूझीलंड संघ चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यानंतर पाकिस्तानचा दावा आहे. दोघांचे 8 सामन्यांत समान 8 गुण आहेत. पण नेट रनरेटमध्ये न्यूझीलंड संघ खूप पुढे आहे. न्यूझीलंडला 9 नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा ग्रुप सामना खेळायचा आहे.
वाचा : Virat Kohli Sachin Tendulkar : कोहलीला सचिन म्हणाला, “मला 365 दिवस लागले, पण तू…”
न्यूझीलंड संघ चौथ्या क्रमांकासाठी दावेदार
न्यूझीलंडने हा सामना गमावल्यास पाकिस्तानच्या अपेक्षा लक्षणीय वाढतील. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्ध 11 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शेवटचा ग्रुप सामना खेळायचा आहे. बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर न्यूझीलंड-श्रीलंका सामना पावसामुळे स्थगित झाला तर, दोघांचे 1-1 गुण समान होतील. तरीही पाकिस्तानचा फायदा होईल.
ADVERTISEMENT
न्यूझीलंडचा पराभव झाल्यास किंवा सामना स्थगित झाल्यास पाकिस्तानी संघाला इंग्लंडला हरवून सेमीफायनल फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळेल. मात्र येथेही मोठी अडचण समोर उभी आहे. ती अडचण दुसरी कोणती नसून अफगाणिस्तान संघाची आहे. सध्या नंबर-4 च्या दावेदारांमध्ये 3 संघ आहेत, त्यापैकी तिसरा संघ अफगाणिस्तान आहे.
ADVERTISEMENT
वाचा : Crime : दरवाजा उघडायला केला उशीर अन् मुलांसमोरच पत्नीवर सपासप वार, जागेवरच सोडला जीव
अफगाणिस्तानला आणखी 2 सामने खेळावे लागतील
अफगाणिस्तान संघाचे सध्या 8 गुण आहेत आणि 2 सामने बाकी आहेत. अफगाणिस्तानला हे दोन सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहेत. जर अफगाणिस्तानने हे दोन्ही सामने जिंकले, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना मागे टाकून ते नंबर-4 गाठतील आणि सेमीफायनल फेरीत प्रवेश करतील.
पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांविरुद्ध जिंकणे अफगाणिस्तानसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळेच न्यूझीलंड आणि पाकिस्तान तगडे दावेदार आहेत. तसंच, अफगाणिस्तानने आतापर्यंत तीन मोठे उलटफेर अनुभवले आहेत. त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे.
विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये काय असेल समीकरण?
- भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर राहून पात्र ठरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेनेही 12 गुणांसह प्रवेश केला आहे.
- तिसऱ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलिया मजबूत दावेदार आहे. त्यांचे सध्या 7 सामन्यांत 10 गुण आहेत. त्याला आपले उर्वरित दोन सामने अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने त्यांच्यासाठी सोपे आहेत.
- न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चौथ्या क्रमांकाचे दावेदार आहेत. जर न्यूझीलंडने शेवटचा सामना जिंकला आणि अफगाणिस्तानने उरलेल्या 2 पैकी एकही सामना गमावला तर न्यूझीलंड क्रमांक 4 वर पात्र ठरेल.
- जर न्यूझीलंड संघ आपला शेवटचा सामना हरला आणि अफगाणिस्तानने आपल्या उरलेल्या 2 सामन्यांपैकी एकही गमावला, तर पाकिस्तान शेवटचा सामना जिंकून 4 क्रमांकावर राहून पात्र ठरेल.
- अफगाणिस्तानने उर्वरित दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर तो क्रमांक-4 वर पात्र ठरेल. मग न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे विजयही व्यर्थ ठरतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT