Ind vs Aus 1st Odi : मायदेशात ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड, आकडे काय सांगतात?
India vs Australia 1st Odi : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज 17 मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर थोड्याच वेळात सूरू होणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे. या सामन्यापुर्वी जाणून घेऊयात टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया ( India vs Australia) वनडेत कोणत्या संघाचे पारडं जड […]
ADVERTISEMENT
India vs Australia 1st Odi : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज 17 मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर थोड्याच वेळात सूरू होणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे. या सामन्यापुर्वी जाणून घेऊयात टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया ( India vs Australia) वनडेत कोणत्या संघाचे पारडं जड आहे. (ind vs aus 1st odi series statistics steve smith hardik pandya one day match)
ADVERTISEMENT
सर्वांधिक धावांनी विजय
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia) वनडेत अनेकदा आमने सामने आले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 208 अशा सर्वांधिक धावांनी विजय मिळवला होता. 2004 साली सिडनीत हा सामना रंगला होता. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 118 धावांनी विजय मिळवला होता. 2001 ला इंदुरमध्ये हा सामना झाला होता. तसेच ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध 389 वर 4 विकेट अशा सर्वाधिक स्कोर केला होता. सीडनी 2020 सामन्या दरम्यानची ही गोष्ट आहे. तर भारताने 383 वर 6 विकेट अशा सर्वाधिक धावा ठोकल्या होत्या. बंगळूरू 2013 ला हा सामना रंगला होता.
सर्वांधिक शतकांचा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक शतकांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित 40 डावात 8 शतके ठोकली आहेत. त्याच्यानंतर सचिन तेंडूलकरचा नंबर लागतो. सचिनने 70 डावात 9 शतक ठोकलीत. तसेच विराट कोहलीने 41 डावात 8 शतक मारले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉटींगने 59 डावात 6 तर स्टीव्ह स्मिथने 18 डावात 5 शतक ठोकली आहेत.
हे वाचलं का?
‘सचिनला शिव्या देत होतो अन् त्याने…’; सकलेन मुश्ताकने सांगितला भन्नाट किस्सा
दोन्ही संघातला सिक्सरकिंग कोण?
दोन्ही संघातील सिक्सरकिंग बद्दल बोलायंच झालं तर रोहित (Rohit Sharma) अव्वल आहे. रोहितने 40 डावात 76 सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्यानंतर 35 षटकारासह 70 डावात सचिनचा नंबर लागतो. सचिननंतर धोनीने 48 डावात 33 षटकार ठोकलेत. ऑस्ट्रेलियाकडून एरॉन फिंचने 31 डावात 32 षटकार मारले आहेत. ग्लेन मॅक्सवेलने 27 डावात 44 छक्के षटकार ठोकलेत.
ADVERTISEMENT
WPL: सलग पाच पराभवानंतर विजय, RCB सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो का?
ADVERTISEMENT
सर्वाधिक वैयक्तिक धावा
सर्वाधिक वैयक्तिक धावांमध्ये सचिन तेंडूलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने 71 सामन्यात 3 हजार 77 धावा ठोकल्या आहेत. सचिननंतर धोनीचा नंबर लागतो. धोनीने 55 डावात 1 हजार 660 धावा केल्या आहेत. रोहितने 40 डावात 2 हजार 208 धावा केल्या आहेत.तर विराटने 43 सामन्यात 2 हजार 83 धावा केल्या आहेत. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा एकमेव खेळाडू आहे. रिकी पॉंटींगने 59 सामन्यांमध्ये 2 हजार 164 धावा केल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट बॉलिंग
सर्वोत्कृष्ट बॉलिंगमध्ये टीम इंडिया वरचढ आहे. मुरली कार्तिकने 10 ओव्हरमध्ये 3 मेडन आणि 27 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. कार्तिक नंतर ऑस्ट्रेलियाच्या केन मॅक्लेचा नंबर लागतो. त्याने 11.5 ओव्हरमध्ये 3 मेडन टाकून 39 धावा देत 6 विकेट काढल्या आहेत. त्यानंतर अजित आगरकरचा नंबर येतो. अजित अगरकरने 9.3 ओव्हरमध्ये 42 धावा देत 6 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलने 10 ओव्हरमध्ये 42 धावा देत 6 विकेट घेतल्या. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा एकमेव बॉलर आहे. मिचेल स्टार्कने 10 ओव्हरमध्ये 43 धावा देत 6 विकेट काढल्या होत्या.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत कोण मारणार बाजी; कोणाचा रेकॉर्ड आहे सरस?
सर्वाधिक विकेट्स
सर्वाधिक विकेटस घेण्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडं जड आहे. यात ब्रेट ली अव्वल आहे. ब्रेट लीने 32 सामन्यात 55 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर कपिल देवचा नंबर लागतो. कपिलने 41 सामन्यात 45 विकेट घेतल्या आहेत. मिचेल जॉनसन 27 सामन्यत 43 विकेट घेतल्या आहेत. स्टीव वॉने 53 सामन्यात 43 विकेट घेतल्या आहेत. तर अजीत आगरकरने 21 सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत.
हेड टू हेड सामन्यात कोणाची बाजी ?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात ( India vs Australia) 143 सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 80 सामने तर भारताने 53 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलिया 53 आणि टीम इंडियाचा 80 सामन्यात पराभव झाला आहे. तर 10 सामने ड्रा झालेत. भारतीय भूमीवर खेळवल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दोघे 64 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये 30 सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर 29 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. यामध्ये 5 सामने ड्रा ठरले आहेत.
दरम्यान आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT