Virat Kohli-Rohit Sharma : गुडन्यूज! विराट-रोहितला वर्ल्ड कपमधील कामगिरीचं मिळालं फळ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ind vs aus t20 odi ranking declare virat kohli rohit sharma jumped shubman gill continue number 1 batter
ind vs aus t20 odi ranking declare virat kohli rohit sharma jumped shubman gill continue number 1 batter
social share
google news

ICC One Day Ranking : वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. या पराभवाने टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंगल. हा पराभव भारतीय चाहत्यांच्या मनावर मोठी जखम करून गेला आहे. या जखमेवर काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ही खरं तर वर्ल्ड कप पराभवानंतर भारतीय चाहत्यांनी मिळालेली खुशखबर म्हणायला हरकत नाही आहे. कारण आता विराट कोहली आणि रोहित शर्माने मोठी कामगिरी केली आहे. नेमकी ही कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात. (ind vs aus t20 odi ranking declare virat kohli rohit sharma jumped shubman gill continue number 1 batter)

ADVERTISEMENT

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli)  चांगली फलंदाजी केली होती. विराट तर वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्यामुळे या चांगल्या फलंदाजीचे त्यांना आता मोठं गिफ्ट मिळालंय. नुकतीच फलंदाजांची वनडे रॅकिंग जाहिर झाली आहे. या रॅकिंगमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माला मोठा फायदा झाला आहे.

हे ही वाचा : Rajouri Encounter : घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् सीमेवर आलं वीरमरण; ह्रदयद्रावक कहाणी

या वनडे रॅकिंगमध्ये विराट कोहली 791 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. वर्ल्ड कपमध्ये विराटने 765 धावा केल्या होत्या. त्या त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे तो रॅकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी पोहोचलाय. याच रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल 826 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 824 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

हे वाचलं का?

विराट कोहलीसह रोहित शर्माच्या क्रमांकातही किंचित सुधारणा झाली आहे. रोहितने एका स्थानाची सुधारणा करत चौथे स्थान गाठले आहे. रोहित 597 धावा ठोकून 769 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये गिलने 345 धावा तर बाबर आझमने 320 धावा आहे.
कोहली 2017 ते 2021 दरम्यान सलग 4 वर्षे 1258 दिवस क्रमवारीत अव्वल स्थानी होता आणि अलीकडेच काही वर्षांपूर्वी बाबरने प्रथम क्रमांक पटकावला होता, तर गिल केवळ वर्ल्ड कप दरम्यान अव्वल स्थानावर पोहोचला होता.

हे ही वाचा : ‘नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय?’, ठाकरेंच्या सेनेच्या पलटवार, बावनपत्ती’ म्हणत…

ट्रेविस हेडची रॅकिंगमध्ये मोठी झेप

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक दोन स्थानांनी घसरून पाचव्या स्थानावर आला आहे. तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल पाचव्या स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये  552 धावा केल्या आहेत. वनडे क्रमवारीत सर्वात मोठी झेप ट्रॅव्हिस हेडने घेतली आहे. त्याने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शानदार शतकासह ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पटकावल. त्यासह 28 स्थानावरून 15 व्या स्थानी झेप घेतली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT