Ind vs Aus : कोहली, राहुलचा तडाखा! ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून हिसकावला विजय!
टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची शानदार सुरुवात केली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला.
ADVERTISEMENT

भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची विजयासह शानदार सुरुवात केली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने सरस कामगिरी करत कांगारूंचा धुव्वा उडवला. (the Indian team defeated Australia by 6 wickets)
पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या स्टार फिरकीपटूंनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला 199 धावांत गुंडाळले. जडेजाने 3 तर कुलदीपने 2 बळी घेतले. यानंतर भारतीय संघाला 200 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले, पण सुरुवातील तेही अशक्य वाटत होते.
टॉप-3 फलंदाजांना उघडता आले नाही खाते
भारतीय संघाने पहिल्या 2 षटकात 2 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. तिन्ही स्टार खेळाडू शून्यावर बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सामन्याची सूत्रं हाती घेतली आणि कांगारूंचा मारा निष्प्रभ ठरवत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.