Video : क्रिकेटच्या पंढरीत प्रेक्षकांचं लाजिरवाणं कृत्य, लोकेश राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क
भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जो रुटच्या शतकाच्या आधारावर सामन्यावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. परंतू क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केलेल्या एका कृत्यामुळे या सामन्याला गालबोट लागलं आहे. तिसऱ्या तिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात बॅटींग करत असताना भारताचा केएल राहुल थर्ड मॅन बाऊंड्री लाईनजवळ फिल्डींग करत होता. त्यावेळी डावातली ६९ […]
ADVERTISEMENT
भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जो रुटच्या शतकाच्या आधारावर सामन्यावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. परंतू क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केलेल्या एका कृत्यामुळे या सामन्याला गालबोट लागलं आहे.
तिसऱ्या तिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात बॅटींग करत असताना भारताचा केएल राहुल थर्ड मॅन बाऊंड्री लाईनजवळ फिल्डींग करत होता. त्यावेळी डावातली ६९ वी ओव्हर सुरु असताना प्रेक्षकांमधून काही जणांनी शॅम्पेन कॉर्क (बॉटलची झाकणे) केएल राहुलच्या दिशेने फेकून मारली.
लोकेश राहुलने आपला कर्णधार विराट कोहलीला ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल त्यानेही नाराजी व्यक्त केली. इतकच नव्हे तर त्याने राहुलला पुन्हा तुला कोणी मारलं तर ते कॉर्क पुन्हा प्रेक्षकांमध्ये फेक असं सांगितलं. राहुलनेही आपल्या कर्णधाराचा सल्ला ऐकत नंतर ते कॉर्क प्रेक्षकांमध्ये फेकले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी इंग्लिश चाहत्यांच्या या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
#Kohli mass ??
Crowd threw something on the ground where KL Rahul is standing !
Kohli signals KL to throw it out of the ground#ENGvIND #Kohli#IndvsEng pic.twitter.com/ZjIRm3JEqj
— Gowtham ᴹᴵ (@MGR_VJ) August 14, 2021
Champagne cork !!
Cheap from England fans #ENGvIND pic.twitter.com/5Jd6HZEu9C
— Gowtham ᴹᴵ (@MGR_VJ) August 14, 2021
Virat Kohli signaling to KL Rahul to throw it back to the crowd pic.twitter.com/OjJkixqJJA
— Pranjal (@Pranjal_King_18) August 14, 2021
Jis batsman ne 100 mara ho use champagne Cork marke pareshan krna is NOT FUNNY.#shame_on_Eng#KLRahul@ICC @BCCI #English #ENGvIND pic.twitter.com/PnDc8zMssd
— Nitin Yadav (@YNitin007) August 14, 2021
England Fans Are Throwing A Beer Cork To KL Rahul..!?@englandcricket ??#INDvsENG pic.twitter.com/CqeuuqhL6L
— A D H !™ (@AdhiIsHere) August 14, 2021
KL Rahul fielding in the deep. takes a skilled player to know how to avoid the random cork hazards: pic.twitter.com/IuAZOwBfyc
— BionicBanker (@BrokenBanker) August 14, 2021
भारताचा डाव संपल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मात्र, नंतर जो रुटने इंग्लंडचा डाव सावरताना शतकी खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक केले. रुटने डावाच्या ८२ व्या ओव्हरमध्ये त्याचे २२ वे कसोटी शतक पूर्ण केले. तर बेअरस्टो ५७ धावा करुन बाद झाला. या दोघांच्या खेळीमुळे इंग्लंडने तिसऱ्या दिवशी ९६ षटकांपर्यंत ३०० धावांचा टप्पा पार केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT