Ind vs SL : पहिला दिवस भारताचा, पंतच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाची त्रिशतकी मजल
श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाअखेरीस त्रिशतकी मजल मारली आहे. ६ विकेटच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३५७ धावांपर्यंत मजल मारत स्वतःचं बाजू मजबूत केली आहे. ऋषभ पंतची आक्रमक फटकेबाजी आणि त्याला हनुमा विहारी, विराट कोहली, रविंद्र जाडेजा यांनी दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस ही मजल मारली आहे. टॉस […]
ADVERTISEMENT

श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाअखेरीस त्रिशतकी मजल मारली आहे. ६ विकेटच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३५७ धावांपर्यंत मजल मारत स्वतःचं बाजू मजबूत केली आहे. ऋषभ पंतची आक्रमक फटकेबाजी आणि त्याला हनुमा विहारी, विराट कोहली, रविंद्र जाडेजा यांनी दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस ही मजल मारली आहे.
टॉस जिंकून कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना असल्यामुळे त्याला फलंदाजी करताना पाहण्यासाठी मैदानात प्रेक्षक उत्सुक होते. रोहित आणि मयांक जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनीही काही चांगले फटके खेळून पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लहिरु कुमाराच्या बॉलिंगवर लेग साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा २९ धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला.
यानंतर हनुमा विहारीच्या साथीने छोटेखानी भागीदारी करत मयांकने भारताचा डाव सावरला. भारताची ही जोडी फोडण्यासाठी लंकेने फिरकीपटू एम्बुलदेनियाला पाचारण केलं. एम्बुलदेनियानेही आपल्या कर्णधाराला नाराज न करता मयांक अग्रवालला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर विराट कोहलीने हनुमाच्या साथीने पहिल्या सत्रातली उर्वरित षटकं खेळून काढली.
That's Stumps on Day 1 of the 1st Test.#TeamIndia 357/6 after 85 overs. Rishabh Pant and Ravindra Jadeja together added 104 runs on the board.
Pant 96
Jadeja 45*Scorecard – https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/pXSRnSXBsh
— BCCI (@BCCI) March 4, 2022
विराट आणि हनुमाची जोडी मैदानावर चांगली कामगिरी करत होती. हनुमाने संयमी खेळी करत आपलं अर्धशतकही साजरं केलं. ही जोडी लंकेला जड जाणार असं वाटत असतानाच एम्बुलदेनियाने विराटला क्लिन बोल्ड केलं. त्याने ४५ धावांची इनिंग खेळली. शंभराव्या कसोटी सामन्यात शतकी खेळीच्या अपेक्षेने मैदानात आलेल्या चाहत्यांची मात्र यावेळी निराशा झाली. यानंतर पाठोपाठ हनुमा विहारीही विश्वा फर्नांडोच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला, त्याने ५८ धावा केल्या.