एग्जिट पोल

बेअरस्टो-स्टोक्स जोडीचा टीम इंडियाला दणका, इंग्लंड सिरीजमध्ये बरोबरीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जेसन रॉय, जॉन बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या तीन प्लेअर्सच्या झंजावाती खेळासमोर टीम इंडियाचा दुसऱ्या वन-डे सामन्यात निभाव लागला नाही. भारतीय संघाने विजयासाठी दिलेलं ३३७ रन्सचं टार्गेट इंग्लंडने सहज पूर्ण केलं. जॉनी बेअरस्टोने १२४ रन्स केल्या तर त्याला बेन स्टोक्सने ९९ आणि जेसन रॉयने ५५ रन्सची इनिंग खेळत चांगली साथ दिली. भारताकडून प्रसिध कृष्णाने दोन विकेट घेतल्या पण इंग्लंडच्या बॅट्समनवर अंकुश लावण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आलं.

जाणून घ्या शतकवीर लोकेश राहुलच्या ‘या’ सेलिब्रेशनचा अर्थ

पहिल्या सामन्यात आश्वासक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा विश्वास दुणावला होता. परंतू जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी ११० रन्सची पार्टनरशीप केली. दोन्ही बॅट्समननी यावेळी मैदानात चौफेर फटकेबाजी करत टीम इंडियाच्या नाकीनऊ आणले. इंग्लंडच्या बॉलर्सचा रुद्रावतार पाहून भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला. अखेरीस एक चोरटी रन घेताना जेसन रॉय रनआऊट झाला आणि टीम इंडियाला पहिलं यश मिळालं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र यानंतरही इंग्लंडचा संघ थांबला नाही. बेअरस्टोने बेन स्टोक्सच्या साथीने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बॉलर्सची धुलाई सुरु केली. आपलं शतक झळकावल्यानंतर बेअरस्टो आणखीन आक्रमक खेळी करायला लागला होता. ११२ बॉलमध्ये ११ फोर आणि ७ सिक्स मारत १२४ रन काढून बेअरस्टो प्रसिध कृष्णाच्या बॉलिंगवर आऊट झाला. परंतू तोपर्यंत सामना भारताच्या हातातून निसटला होता. बेअरस्टो आऊट झाल्यानंतर स्टोक्सने सूत्र आपल्या हाती घेत भारतीय बॉलर्सना सळो की पळो करुन सोडलं. परंतू सेंच्यूरी पूर्ण करण्यासाठी एक रन हवी असताना स्टोक्स भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याने ५२ बॉलमध्ये ४ फोर आणि १० सिक्स लगावत ९९ रन्स केल्या. यानंतर ड्वाइड मलान आणि लिवींगस्टोनने इंग्लंडच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

त्याआधी टीम इंडियाने लोकेश राहुल, विराट कोहली आणि ऋषभ पंतच्या आक्रमक खेळीच्या जोरावर सलग दुसऱ्या मॅचमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडला होता. शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडीने दुसऱ्या सामन्यात निराशा केल्यानंतर मधल्या फळीतल्या बॅट्समननी आपली जबाबदारी ओळखत लौकिकाला साजेसा खेळ केला. लोकेश राहुलने १०८ रन्सची इनिंग खेळली. त्याला ऋषभ पंतने ७७ तर विराट कोहलीने ६६ रन्स काढून चांगली साथ दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT