Ind vs Pak : मोहम्मद शमी इन, ‘हा’ खेळाडू आऊट… पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये फेरबदल?
India vs Pakistan Playing 11 in World Cup 2023 : सलामीवीर शुभमन गिलच्या खेळण्याबद्दल अनिश्चितता आहे. दुसरीकडे टीम इंडियात काही बदल होण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीला खेळवलं जाऊ शकते.
ADVERTISEMENT

India vs Pakistan Playing 11 in World Cup 2023 Ahmedabad : विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाची आता 14 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत ‘लढाई’ होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ सामना बघायला मिळणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून क्रमवारीत आघाडी घेतली आहे. परंतु असे असूनही टीम इंडियामध्ये काही कमतरता आहेत. या दुरुस्त केल्यास टीम इंडियाची विजयी मोहीम आणि विश्वचषक जिंकण्याचा दावा अबाधित राहील.
टीम इंडियाची स्थिती काय आहे?
1) सलग दोन सामने जिंकल्यानंतरही टीम इंडियाला अजूनही काही गोष्टींमध्ये सुधारणा आवश्यक आहे. इशान किशनपासून सुरुवात करायची झाली, तर त्याने दिल्लीच्या सामन्यात 47 धावा केल्या असतील, पण त्याच्या खेळण्यात फारसा आत्मविश्वास नव्हता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो अत्यंत बेजबाबदारपणे शॉट खेळून बाद झाला होता.
2) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इशान किशन शून्यावर बाद झाला. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशनला सलामीवीर म्हणून स्वत:ला मजबूत बनवण्याची मोठी संधी आहे.