Mumbai Lockdown चा IPL वर परिणाम होणार? BCCI म्हणतं…
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकएंड लॉकडाउनची घोषणा केली. ३० एप्रिलपर्यंत राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहे. अशा परिस्थितीत ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनवरही टांगती तलवार तयार झाली होती. परंतू महाराष्ट्र आणि मुंबईतल्या लॉकडाउनचा आयपीएलच्या सामन्यांवर परिणाम होणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. त्यातच राज्य सरकारनेही मर्यादीत स्वरुपात काही आऊटडोअर गेम्सना […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकएंड लॉकडाउनची घोषणा केली. ३० एप्रिलपर्यंत राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहे. अशा परिस्थितीत ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनवरही टांगती तलवार तयार झाली होती. परंतू महाराष्ट्र आणि मुंबईतल्या लॉकडाउनचा आयपीएलच्या सामन्यांवर परिणाम होणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. त्यातच राज्य सरकारनेही मर्यादीत स्वरुपात काही आऊटडोअर गेम्सना परवानगी दिल्यामुळे सध्यातरी आयपीएल सामन्यांवर कोणतंही संकट नाही असंच चित्र दिसत आहे.
ADVERTISEMENT
IPL 2021 : विराट कोहलीचं टेन्शन वाढलं, RCB च्या स्टार बॅट्समनला कोरोनाची लागण
आयपीएलमध्ये खेळणारे सर्व प्लेअर्स हे याआधीच बायो सिक्युअर बबलमध्ये गेले आहे. इतकच काय तर टीमला मैदानात ने-आण करणाऱ्या बसचे ड्रायव्हरही बायो सिक्युअर बबलमध्ये असणार आहेत. त्यामुळे या लॉकडाउनचा सामन्यावर फारसा परिणाम होणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ANI शी बोलताना दिली. “गेल्या सिझनमध्ये युएईत आम्ही ज्या पद्धतीने वातावरण तयार केलं होतं, यंदाही तसंच वातावरण असणार आहे. याव्यतिरीक्त खेळाडूंच्या ठराविक दिवसांनी चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे या लॉकडाउनचा सामन्यांवर परिणाम होणार नाही.”
हे वाचलं का?
एकीकडे बीसीसीआयने खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काळजी घेतलेली असली तरीही आतापर्यंत स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच ३ खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या देवदत पडीक्कलला कोरोनाची लागण झाली आहे. यातील नितीश राणाने कोरोनावर मात केली असून तो ट्रेनिंग कँपमध्ये दाखल झाला आहे.
IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला कोरोनाची लागण
ADVERTISEMENT
दरम्यान, बीसीसीआय आपल्या खेळाडूंना कोरोनाची लस देता येईल का याचा विचार करत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरु असल्याची माहिती, BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. ते ANI वृत्तसंस्थेशी बोलत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT