IPL 2021 : दिल्लीत पोलार्डचं वादळ, चेन्नईची धुळधाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सूर गसवसलेल्या चेन्नई सुपरकिंग्जची विजयी घोडदौड अखेरीस गतविजेत्या मुंबई इंडियन्सने थांबवली आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेलं २१९ रन्सचं आव्हान मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. पोलार्डने चेन्नईच्या बॉलर्सची पिसं काढत ३४ बॉलमध्ये नॉटआऊट ८७ रन्सची इनिंग खेळली. ज्यात ६ फोर आणि ८ सिक्सचा समावेश होता.

ADVERTISEMENT

IPL 2021 : Bio Secure Bubble मध्ये आम्ही सुखरुप आहोत : क्विंटन डी-कॉक

टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. ट्रेंट बोल्टने ऋतुराज गायकवाडला स्वस्तात माघारी धाडलं. परंतू यानंतर मोईन अली आणि फाफ डु-प्लेसिस यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत चेन्नईच्या डावाला आकार दिला. दोन्ही बॅट्समननी मैदानात चौफेर फटकेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १०८ रन्सची पार्टनरशीप केली. मोईन अली आणि डु-प्लेसिस यांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडण्यात मुंबईला मदत केली.

हे वाचलं का?

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत अजिंक्यची अनोखी मदत, ‘मिशन वायू’साठी ३० Oxygen Concentrators दान

मोईन अलीला ५८ रन्सवर आऊट केल्यानंतर पोलार्डने काही क्षणांमध्येच डु-प्लेसिसची इनिंग ५० रन्सवर संपवली. इतकच नव्हे तर सुरेश रैनाही पोलार्डच्या बॉलिंगवर २ रन्स काढून स्वस्तात माघारी परतला. परंतू यानंतर मैदानावर आलेल्या अंबाती रायुडूने चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या बॉलर्सची पळता भुई थोडी केली. २७ बॉलमध्ये ४ फोर आणि ७ सिक्स लगावत रायुडूने नॉटआऊट ७२ रन्स केल्या. जाडेजानाही त्याला उत्तम साथ दिली. या जोरावर चेन्नईचा संघ २१८ पर्यंत मजल मारु शकला.

ADVERTISEMENT

IPL 2021 : कोरोनाविरुद्ध लढ्यात राजस्थान रॉयल्सचं मोठं योगदान, ७.५ कोटींची आर्थिक मदत

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल मुंबईची सुरुवात चांगली झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी आक्रमक खेळ करत पहिल्या विकेटसाठी ७१ रन्सची पार्टनरशीप केली. मुंबईचे बॅट्समन मॅच जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच उतरताना दिसले. शार्दुल ठाकूरने रोहित शर्माला आऊट करत मुंबईला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून मुंबई सावरते न सावरते तोच सूर्यकुमार यादव आणि डी-कॉक माघारी परतले. यावेळी मैदानात आलेल्या पोलार्डने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत सामन्याचं चित्रच पालटलं. सर्वात आधी कृणाल पांड्यासोबत फटकेबाजी करुन पोलार्डने मुंबईचं आव्हान सामन्यात कायम राखलं.

चेन्नईच्या बॉलर्सचा प्रत्येक बॉल पोलार्ड हा फोर-सिक्सच्या उद्देशानेच मारत होता. १७ बॉलमध्ये आपली हाफ सेंच्युरी पूर्ण करत पोलार्डने यंदाच्या हंगामात सर्वात जलद हाफ सेंच्युरीचा रेकॉर्ड केला. कृणाल पांड्या फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आऊट झाल्यानंतर हार्दिक पांड्याने छोटेखानी इनिंग खेळत मुंबईला विजयाच्या जवळ आणलं. परंतू हार्दिक आणि निशमला झटपट आऊट करत चेन्नईने मुंबईला बॅकफूटला ढकललं. परंतू पोलार्डने अखेरच्या ओव्हरमध्ये एन्गिडीची धुलाई करत विजयासाठीचं आव्हान पूर्ण करत चेन्नईला पराभवाचा धक्का दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT