IPL 2021 : विराटचा अखेरचा प्रयत्नही निष्फळ, RCB चं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात

मुंबई तक

आपल्या कर्णधारपदाच्या काळात RCB ला विजेतेपद मिळवून देण्याचं विराट कोहलीचं स्वप्न अखेरीस स्वप्नच राहिलं आहे. पहिल्या एलिमीनेटर सामन्यात KKR ने RCB वर ४ विकेटने मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. विराटने युएईत दाखल झाल्यानंतर यंदाचा हंगाम संपल्यानंतर आपण RCB ची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. KKR ला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीशी दोन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

आपल्या कर्णधारपदाच्या काळात RCB ला विजेतेपद मिळवून देण्याचं विराट कोहलीचं स्वप्न अखेरीस स्वप्नच राहिलं आहे. पहिल्या एलिमीनेटर सामन्यात KKR ने RCB वर ४ विकेटने मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. विराटने युएईत दाखल झाल्यानंतर यंदाचा हंगाम संपल्यानंतर आपण RCB ची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.

KKR ला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीशी दोन हात करावे लागणार आहेत. या सामन्यांतला विजेता अंतिम फेरीत चेन्नईशी दोन हात करेल. RCB ने विजयासाठी दिलेलं १३९ रन्सच आव्हान कोलकात्याने सहज पूर्ण केलं.

पहिल्यांदा फलंदाजी करताना RCB ने डावाची चांगली सुरवात केली. विराट कोहली आणि देवदत पडीक्कल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. दोन्ही बॅट्समननी चांगली फटकेबाजी केली. लॉकी फर्ग्युसनने पडीक्कलला आऊट करत RCB ला पहिला धक्का दिला. यानंतर RCB चे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. के.एस.भारत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हीलियर्स हे बिनीचे शिलेदार एक-एक करुन KKR च्या जाळ्यात अडकत गेले.

ज्यामुळे निर्धारित ओव्हर्समध्ये RCB चा संघ १३८ रन्सपर्यंत मजल मारु शकला. KKR कडून सुनील नारायण ४ तर लॉकी फर्ग्युसनने २ विकेट घेतल्या.