IPL 2022 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, लुईसच्या फटकेबाजीमुळे लखनऊची सामन्यात बाजी

मुंबई तक

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला अद्याप आपला पहिला विजय नोंदवता आलेला नाहीये. सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारुनही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊ सुपरजाएंट संघाने २११ धावांचं आव्हान ३ विकेट राखून पूर्ण करत यंदाच्या हंगामातला पहिला विजय नोंदवला. एका क्षणासाठी चेन्नईचा संघ हा सामना सहज जिंकेल असं चित्र निर्माण झालं होतं. परंतू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला अद्याप आपला पहिला विजय नोंदवता आलेला नाहीये. सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारुनही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊ सुपरजाएंट संघाने २११ धावांचं आव्हान ३ विकेट राखून पूर्ण करत यंदाच्या हंगामातला पहिला विजय नोंदवला. एका क्षणासाठी चेन्नईचा संघ हा सामना सहज जिंकेल असं चित्र निर्माण झालं होतं. परंतू अखेरच्या ओव्हर्समध्ये केलेला स्वैर मारा आणि ढिसाळ फिल्डींगमुळे लखनऊचं काम सोपं झालं.

पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने आश्वासक सुरुवात केली. आक्रमक पवित्रा घेतलेल्या रॉबिन उथप्पाने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये सुरेख फटकेबाजी करत लखनऊच्या गोलंदाजांवर दडपण आणलं. परंतू एक रन घेताना झालेल्या गोंधळामुळे ऋतुराज गायकवाड रनआऊट झाला. परंतू यानंतर आलेल्या चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजाने महत्वपूर्ण इनिंग खेळत संघाची बाजू वरचढ राहील याची काळजी घेतली.

मोईन अली, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रविंद्र जाडेजा आणि धोनी यांनी फटकेबाजी करुन संघाला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. लखनऊकडून आवेश खान, अँड्रू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने ४९ तर मोईन अलीने ३५ धावांची खेळी केली.

२११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या संघाने चांगली सुरुवात केली. कर्णधार लोकेश राहुल आणि क्विंटन डी-कॉक यांनी फटकेबाजी करत ९९ धावांची भागीदारी केली. प्रिटोरीयसने राहुलला ४० धावांवर आऊट करत लखनऊला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला मनिष पांडेही मुंबईकर तुषार देशपांडेच्या जाळ्यात अडकला. क्विंटन डी-कॉकने आपलं अर्धशतक पूर्ण करत चेन्नईच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली. परंतू प्रिटोरियसच्या बॉलिंगवर तो देखील आऊट झाला. डी-कॉकने ४५ बॉलमध्ये ९ चौकार लगावत ६१ धावांची खेळी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp