विश्वविजेता टीम इंडियाची खेळाडू ऋचा घोष बनली DSP; किती मिळणार पगार?
richa ghosh : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू रिचा घोष हिची पश्चिम बंगालमध्ये डीएसपी म्हणून नियुक्ती झाली आहे. रिचाचा पगार किती असेल आणि क्रीडा कोट्याअंतर्गत इतर कोणत्या सुविधा दिल्या जातील ते जाणून घ्या...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विश्वविजेता टीम इंडियाची खेळाडू ऋचा घोष बनली DSP
ऋचा घोषला किती मिळणार पगार?
richa ghosh : भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा विकेटकीपर आणि आक्रमक फलंदाज ऋचा घोष हिला अलीकडेच पश्चिम बंगाल सरकारने स्पोर्ट्स कोट्यातून पोलिस विभागात डीएसपी पदावर नियुक्त केले आहे. ईडन गार्डन्स येथे झालेल्या खास समारंभात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते तिला नियुक्तीपत्र देण्यात आले.
ऋचा घोषने कमी वयात उत्तम कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले. 2020 साली केवळ 16 वर्षांची असताना तिने आपल्या दमदार फलंदाजी आणि प्रभावी विकेटकीपिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधले. नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऋचाने 24 चेंडूत 34 धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या या कामगिरीसाठी सीएबीने तिला 34 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.
डीएसपी झाल्यानंतर ऋचावर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणे, पोलिस पथकांचे नेतृत्व करणे, गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे आणि विविध प्रशासनिक कामांची देखरेख करणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येणार आहेत.










