IPL 2022 : धोनीच्या खेळीने चाहते खुश! मुंबईच्या पहिल्या विजयी स्वप्नावर फेरलं पाणी
महेंद्रसिंह धोनीने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून लढवलेली खिंड आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपला कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. ३ विकेटने सामना जिंकत चेन्नईने आपला दुसरा विजय नोंदवला. मुंबईलाही या सामन्यात विजयाची संधी चालून आली होती. परंतू जयदेव उनाडकटच्या अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत मुंबईच्या स्वप्नांवर […]
ADVERTISEMENT

महेंद्रसिंह धोनीने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून लढवलेली खिंड आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपला कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. ३ विकेटने सामना जिंकत चेन्नईने आपला दुसरा विजय नोंदवला. मुंबईलाही या सामन्यात विजयाची संधी चालून आली होती. परंतू जयदेव उनाडकटच्या अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत मुंबईच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं.
टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने चांगली सुरुवात केली. युवा मुकेश चौधरीने रोहित शर्मा आणि इशान किशन यांना शून्यावर माघारी धाडत मुंबईला मोठे धक्के दिले. या दोन धक्क्यांमधून मुंबई सावरते न सावरते तोच डेवाल्ड ब्रेविसही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मुकेश चौधरीच्या बॉलिंगवर आपली विकेट फेकून बसला. यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्माने मुंबईच्या डावाला आकार दिला.
३ बाद २३ अशा खडतर परिस्थितीत अडकलेल्या मुंबईला सूर्यकुमार आणि तिलक वर्माने सावरलं. विशेषकरुन सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा घेत काही चांगले फटके खेळत मुंबईवरचं दडपण कमी केलं. ही जोडी मैदानावर जम बसवतेय असं वाटत असतानाच मिचेल सँटनरने सूर्यकुमारला माघारी धाडलं. सूर्यकुमारने २१ बॉलमध्ये ३ फोर आणि १ सिक्स लगावत ३२ धावा केल्या. सूर्यकुमार माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने सूत्र हातात घेत फटकेबाजीला सुरुवात केली.
अखेरच्या फळीतल्या हृतिक शोकीन, कायरन पोलार्ड आणि जयदेव उनाडक यांना साथीला घेत तिलक वर्माने आपलं अर्धशतक पूर्ण करत संघाला १५५ धावांचा टप्पा गाठून दिला. तिलक वर्माने ४३ बॉलमध्ये ३ फोर आणि २ सिक्स लगावत ५१ धावा केल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीने ३, ड्वेन ब्राव्होने २ तर सँटनर आणि तीक्षणाने १-१ विकेट घेतली.









