IPL2022 : RCB चं स्वप्न भंगलं! राजस्थानची तब्बल एका दशकानंतर अंतिम फेरीत धडक

मुंबई तक

जॉस बटलरच्या तडाख्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं विजेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळालं. बटलरच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवत तब्बल एका दशकानंतर अंतिम फेरीत धडक मारली. राजस्थानने १५८ धावांचं आव्हान तीन गडी गमावत गाठलं. राजस्थानने ११ चेंडू शिल्लक ठेवत बंगळुरूवर विजय मिळवला. जॉस बटलरने या हंगामातील चौथं शकत झळकावत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहलीशी बरोबरी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जॉस बटलरच्या तडाख्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं विजेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळालं. बटलरच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवत तब्बल एका दशकानंतर अंतिम फेरीत धडक मारली. राजस्थानने १५८ धावांचं आव्हान तीन गडी गमावत गाठलं.

राजस्थानने ११ चेंडू शिल्लक ठेवत बंगळुरूवर विजय मिळवला. जॉस बटलरने या हंगामातील चौथं शकत झळकावत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहलीशी बरोबरी साधली आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या २०१६ मधील हंगामात चार शतकं झळकावली होती.

१५८ धावांचं आव्हान स्वीकारत मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने आक्रमक सुरूवात केली. यशस्वी जायस्वालने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत इरादे स्पष्ट केले. त्यानंतर सिराजच्या दुसऱ्या षटकात जॉस बटलरने दोन चौकार आणि एक षटकार लगावत १५ धावा वसूल केल्या.

तुफानी अंदाजात डावाची सुरूवात केल्यानंतर बटलरने बंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई केली. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात यशस्वी जायस्वाल तंबूत परतला. त्याने १३ चेंडूत २१ धावा केल्या. पहिल्या पॉवर प्ले मध्ये राजस्थानने एक गडी गमावत ६७ धावा केल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp