IPL : खेळाडू खरेदी करण्यासाठी संघाकडे पैसे कसे येतात, कमाई कशी होते?
IPL मध्ये खेळाडूंवर एवढा खर्च करणाऱ्या फ्रँचायझी पैसे कसे कमवतात? एवढा पैसा येतो कुठून?
ADVERTISEMENT

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16वा हंगामात प्रत्येक टीमच्या 7 मॅचेस झाल्या आहेत. यात महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स टीम टॉपवर आहे. मात्र इतर टीम्स सध्या प्ले-ऑफच तिकीट मिळविण्यासाठी चाचपडताना दिसून येत आहेत. इतर टीममधील अनेक खेळाडू जायबंदी आहेत, तर अनेक खेळाडू मायदेशी आहेत. त्यामुळे टीम्सचे प्लेअर मॅनेजमेंट बिघडताना दिसून येत आहे. (How do franchises that spend so much on players make money in the IPL)
अशावेळी चर्चा होते ती या खेळाडूंवर लावलेल्या बोलीची. संघ मालक खेळाडूंवर प्रचंड पैसा मोजून त्यांना ताफ्यात दाखल करुन घेतात. यंदाच्या आयपीएल लिलावात एकूण 405 खेळाडूंसाठी बोली लावली गेली होती. सर्व 10 संघांकडे 206.6 कोटी रुपये होते. आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा जोरदार पाऊस पडतो. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये शर्यत असते आणि काहीवेळा 1 कोटी रुपयांपासून सुरू होणाऱ्या बोली 10 कोटी रुपयांच्या पुढे जातात. एकूणच आयपीएलमध्ये पैशांचा पाऊस खूप पडतो.
Ms Dhoni : ‘माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा’, धोनीने दिले निवृत्तीचे संकेत
पण खेळाडूंवर एवढा खर्च करणाऱ्या फ्रँचायझी पैसे कसे कमवतात? खेळाडूंवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा येतो कुठून? हे आपण समजून घेऊया.
कमाईचं सगळ्यात मोठं साधन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलचे संचालन करते आणि या दोघांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत मीडिया आणि प्रसारण आहे. आयपीएल फ्रँचायझी त्यांचे मीडिया हक्क आणि प्रसारण हक्क विकून जास्तीत जास्त पैसे कमवतात. सध्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. एका अहवालानुसार, सुरुवातीला बीसीसीआय प्रसारण अधिकारातून मिळणाऱ्या कमाईपैकी 20 टक्के रक्कम ठेवत असे आणि 80 टक्के रक्कम संघांना मिळत असे. पण हळूहळू हा वाटा 50-50 टक्क्यांपर्यंत वाढला.