Team India : इशान किशन, श्रेयस अय्यरला मोठा झटका, BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्टमधून आऊट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेट बोर्डाने  (BCCI)सेंट्रल काँन्ट्रॅक्ट लिस्टची घोषणा केली आहे. या कॉन्ट्र्रॅक्ट लिस्टमधून टीम इंडियाचे युवा फलंदाज ईशान किशन आणि श्रेयस अय्यर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
ishan kishan shreyas iyer out of bcci annual contract list announce team india rohit sharma rahul dravid
social share
google news

BCCI Annual Contract List : भारतीय क्रिकेट बोर्डाने  (BCCI)सेंट्रल काँन्ट्रॅक्ट लिस्टची घोषणा केली आहे. या कॉन्ट्र्रॅक्ट लिस्टमधून टीम इंडियाचे युवा फलंदाज ईशान किशन (ishan kishan) आणि श्रेयस अय्यर (shreyas iyer) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. यासह या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये नवख्या ध्रुव ज्युरेल आणि सरफराज खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे.  (ishan kishan shreyas iyer out of bcci annual contract list announce team india rohit sharma rahul dravid) 

बीसीसीआयची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 पर्यंत)

ग्रेड ए प्लस : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा
ग्रेड ए  :  आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के एल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या
ग्रेड बी : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटले आणि यशस्वी जयस्वाल
ग्रेड सी  : रिंकू सिंह,  तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिग्टन सुंदर, मुकेश कुमार,संजू सॅमसन, अर्शदिप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार. 

तर आकाश दीप, विजयकुमार विशाक,  उमराल मलिक, यश दयाल आणि विद्वत कावेरप्पाला फास्ट बॉलिंग कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मोदी यवतमाळमध्ये पण, चर्चा 2014 मध्ये दिलेल्या गॅरंटीची!

'या' खेळाडूना दाखवला बाहेरचा रस्ता

बीसीसीआयने टीम इंडियातील काही खेळाडूंना या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याआधी श्रेयस अय्यरला बी आणि ईशान किशनला सी कॅटेगरी ठेवण्यात आले आहे. त्यावेळेस श्रेयस अय्यरला वर्षाला 3 करोड तर आणि ईशान किशनला 1 करोड रूपये मिळायचे. पण आता या दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर काढण्यात आले आहे. या दोन खेळाडूंसह ए ग्रेडमधूनम ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनाही मोठं नुकसान झालं आहे. 

दरम्यान या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये नवख्या ध्रुव ज्युरेल आणि सरफराज खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या हंगामात 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय सामने किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूला सी ग्रेडमध्ये समाविष्ट केले जाईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

ADVERTISEMENT

चार कॅटेगरीत असे मिळते मानधन 

बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये चार कॅटेगरी असतात. ए प्लस कॅटेगरीत असलेल्या खेळाडूला 7 करोड मानधन मिळते. फक्त ए कॅटेगरीत असलेल्यांना 5 करोड मिळतात.बी कॅटेगरीतल्या खेळाडूंना 3 करोड मिळतात. त्यानंतर सर्वात खाली असलेल्या सी कॅटेगरीतल्या खेळाडूंना 1 करोड रूपये मिळतात. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, काँग्रेसचं सत्तेचं गणित बिघडलं?

ग्रेडनुसार खेळाडूंना किती मानधन मिळते? 

A+ ग्रेड – 7 कोटी रुपये वार्षिक मानधन 
ग्रेड A - 5 कोटी रुपये वार्षिक मानधन 
ग्रेड बी – 3 कोटी रुपये वार्षिक मानधन 
ग्रेड सी -  1 कोटी रुपये वार्षिक मानधन 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT