Team India : ICC नंतर आता BCCI कडून टीम इंडियाला 'इतक्या' कोटींचं बक्षीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

jay shah announce prize money of 125 crores for team india bcci for winning t20 world cup 2024
बीसीसीआयकडून (BCCI) देखील टीम इंडियासाठी मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे.
social share
google news

Prize Money of 125 Crores for Team India: टीम इंडियाने तब्बल 13  वर्षांचा दुष्काळ संपवून विश्वचषक उंचावला आहे.  दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडियाने (Team India) हा विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीकडून टीम इंडियाला बक्षीस मिळालं आहेत, त्याचबरोबर आता बीसीसीआयकडून (BCCI) देखील टीम इंडियासाठी मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. (jay shah announce prize money of 125 crores for team india bcci for winning t20 world cup 2024) 

बीसीसीआयने टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. बीबीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक्सवर ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 

हे ही वाचा : महाराष्ट्राला मिळाली पहिली महिला मुख्य सचिव, कोण आहेत सौनिक?

जय शाह यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांच्यासाठी 125 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करताना आनंद होत असल्याचं वक्तव्य केलं आहे. शाह यांनी म्हटलं आहे की टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत असाधारण कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत त्यांची प्रतिभा आणि दृढनिश्चय दाखवला, त्यांनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं, या अनन्यसाधारण कामगिरीसाठी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ICC कडून किती बक्षीस रक्कम मिळाली? 

टी20 विश्व चषक स्पर्धेच्या एकूण प्राईजची रक्कम होती 11.25 मिलियन डॉलर म्हणजे 93 करोडो रुपये. यात टी20 विश्व चषक विजेत्या संघासाठी प्राईज होते 2.45 मिलियन डॉलर म्हणजे 20.40 कोटी रुपये. त्याचबरोबर बोनस दिला जाणार आहे. म्हणजे टीम इंडियाला 20.45 कोटी रुपये आणि बोनस मिळेल. ही रक्कम आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमध्ये दिलेल्या रकमेच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

हे ही वाचा : ''निवृत्तीचा विचार नव्हता पण...'', रोहित शर्मा असं का म्हणाला?

विश्व चषक स्पर्धेचा उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला 1.28 मिलियन डॉलर म्हणजे 10.67 कोटी रुपये मिळतील. तर  उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 78,7500 डॉलर म्हणजे 6.48 कोटी रुपये मिळतील. विश्व चषक स्पर्धेत खेळलेल्या संघांनाही ठराविक रक्कम मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

कोणत्या संघांना किती पैसे मिळणार?

भारतीय संघ - 20.40 कोटी रुपये 
दक्षिण आफ्रिका - 10.67 कोटी रुपये
अफगाणिस्तान -6.48 कोटी रुपये
इंग्लड -6.48 कोटी रुपये
सुपर 8 मधील संघांना - 3.16 कोटी रुपये
जिंकलेल्या सामन्यासाठी - 26 लाख रुपये. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT