आशिया चषकच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्याने अफगाणिस्तानात जल्लोष; फटाकेही फोडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला १७१ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण त्यांच्या फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचे दडपण सहन करता आले नाही आणि संपूर्ण संघ १४७ धावांवर गारद झाला. या पराभवाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. पाकिस्तानने 2012 मध्ये शेवटचे आशिया चषक जिंकले होते.

ADVERTISEMENT

पाकिस्तानचा पराभव झाल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये जल्लोष

जेतेपद पटकावल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत जल्लोषाचे वातावरण आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानमध्ये श्रीलंका संघाच्या विजयावर लोकांनी खूप आनंद साजरा केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काबुल शहरातील असून, यामध्ये अफगाणिस्तानचे लोक पाकिस्तानच्या पराभवावर नाचण्यासोबतच फटाके फोडत होते.

हे वाचलं का?

विजयानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराची प्रतिक्रिया

विजयानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका म्हणाला, ‘गेल्या वर्षीही आम्ही क्वालिफायर खेळलो होतो. तीन-चार वर्षांपूर्वी आलेला हा सेटअप आहे. गेली दोन वर्षे आमच्यासाठी खरोखरच चांगली होती आणि आशिया चषक जिंकल्याने आम्हाला विश्वचषकासाठी मदत होईल. या विजयामुळे विश्वचषक पात्रता फेरीतही मदत होईल कारण आम्ही मुख्य स्पर्धा होण्यापूर्वी त्या परिस्थितीत खेळणार आहोत, त्यामुळे आमच्यासाठी ते खरोखर चांगले असेल, असं कर्णधार म्हणाला.

ADVERTISEMENT

लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणून आनंद होतो : राजपक्षे

ADVERTISEMENT

दरम्यान, सामना जिंकून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारा भानुका राजपक्षे म्हणाला, ‘आम्ही सर्वांनी काही दशकांपूर्वी संपूर्ण जगाला दाखवून दिले होते की आमच्या बाजूने कोणती आक्रमकता आहे आणि आम्हाला त्या क्षणांची आठवण करून द्यायची होती. मला वाटते की एक युनिट म्हणून आम्ही सध्या खूप चांगले काम करत आहोत. ही गती आम्हाला विश्वचषकातही कायम ठेवायची आहे. एक राष्ट्र म्हणून माझ्या मते हा मोठा विजय आहे, श्रीलंकेसाठी हा कठीण काळ आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू आणताना आम्हाला खूप आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

…जेव्हा अफगाणी आणि PAK चाहते भिडले

आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने मनं जिंकणारी कामगिरी केली होती. गट सामन्यात अफगाणिस्तानने दमदार खेळ दाखवत श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करत सुपर-4 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुपर-फोरमधील तीनही सामने त्याला गमवावे लागले, पण पाकिस्तानविरुद्धचा सामना अगदी जवळचा होता. त्या सामन्यादरम्यान फरीद अहमद आणि आसिफ अली एकमेकांशी भिडले. त्याचवेळी सामन्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी चाहत्यांमध्ये चुरशीची लढत झाली.

ती लढत अफगाणिसस्तान बाहेर पडल्यानंतर देखील पाहायला मिळाली. आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तान हरला आणि अफगाणिस्थानच्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT