खेळाडूंच्या पाठीशी उभं न राहिल्याने अनिल कुंबळेवर नाराज होता विराट – रत्नाकर शेट्टींचा दावा
२०१७ साली चॅम्पिअन्स ट्रॉफी दरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादाबद्दलच्या बातम्या चांगल्याच रंगल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर अनिल कुंबळे आणि विराटमधला वाद पहिल्यांदा समोर आला होता. या वादानंतर अनिल कुंबळेला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक प्रो. रत्नाकर शेट्टी यांनी आपल्या आगामी On Board […]
ADVERTISEMENT

२०१७ साली चॅम्पिअन्स ट्रॉफी दरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादाबद्दलच्या बातम्या चांगल्याच रंगल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर अनिल कुंबळे आणि विराटमधला वाद पहिल्यांदा समोर आला होता. या वादानंतर अनिल कुंबळेला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक प्रो. रत्नाकर शेट्टी यांनी आपल्या आगामी On Board : Test.Trial.Triumph, My Years in BCCI या पुस्तकात या बादाबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे.
रत्नाकर शेट्टी यांनी केलेल्या उल्लेखाप्रमाणे, त्या वेळी काही लोकांना अनिल कुंबळे हा मुख्य प्रशिक्षक म्हणून नको होता. अनेक महत्वाच्या विषयांवर कुंबळे आणि विराटचं एकमत नसलायचं आणि अनेकदा विराटची बाजू उचलून धरली जायची. रत्नाकर शेट्टी यांच्या सांगण्यानुसार, २०१७ साली भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला अंतिम सामन्याआधी लंडनमध्ये एक बैठक पार पडली होती.
त्या बैठकीला अनिल जोहरी, विराट, अमिताभ चौधरी आणि डॉ. श्रीधर हे उपस्थित होते. अनिल कुंबळे हा खेळाडूंच्या पाठीशी उभं राहत नसल्यामुळे विराट त्याच्यावर नाराज होता. तसेच अनिलच्या उपस्थितीत ड्रेसिंग रुममध्ये गंभीर वातावरण तयार व्हायचं असंही विराटचं म्हणणं असल्याचं शेट्टींनी म्हटलं आहे. अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीला चाहत्यांकडून टीकेचा सामना करावा लागला होता.